बेळगाव : बिम्स डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बेळगाव जिल्हा रुग्णालयात घडली आहे. बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील नागनूर तांडा येथील कल्पना राठोड या मृत महिलेचे नाव आहे. काल रात्री तिने शस्त्रक्रियेद्वारे मुलाला जन्म दिला. आई आणि बाळ निरोगी असून कोणतीही अडचण नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. मात्र मंगळवारी सकाळी …
Read More »LOCAL NEWS
आर. एम. चौगुले यांनी केले विजेत्या खेळाडूंचे जल्लोषात स्वागत
मिनी ऑलिम्पिक खो-खो स्पर्धेत बेळगाव विजेता बेळगाव : बंगळूर येथे सुरू असलेल्या मिनी ऑलिम्पिक खो-खो स्पर्धेत बेळगावातील मुलांच्या संघाने अंतिम फेरीत म्हैसूरला नमवित विजेतेपद पटकाविले. या संघाचे आगमन बेळगाव रेल्वेस्थानकावर होताच महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते आर. एम. चौगुले यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. उपस्थित सर्व खेळाडूंना गुलाबपुष्प आणि …
Read More »विश्वेश्वरय्या नगर परिसरात चोरीच्या प्रकारात वाढ
बेळगाव : बेळगाव शहरात दिवसेंदिवस खून, लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, विश्वेश्वरय्या नगर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वसतिगृहात एकाच महिन्यात पाच घरफोड्या झाल्या असून, स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या महिनाभरात चोरीच्या पाच घटना उघडकीस आल्या आहेत. बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या घरासमोरील घरातून अशा घटना घडल्या तर सामान्य जनतेच्या घरांचे …
Read More »खादरवाडी गावच्या जमीन प्रकरणाला नवी कलाटणी
बेळगाव : खादरवाडी गावच्या जमीन प्रकरणाला आता नवी कलाटणी आली आहे. खादरवाडी गावच्या शेतकऱ्यांनी काल गावात निषेध मोर्चा, निदर्शने केल्यामुळे जमीन विकणाऱ्या काही दलाल सदस्यांनी बैठकीमध्ये संपूर्ण गावांसमोर आपले म्हणणे मांडले. यामध्ये त्यांनी हा व्यवहार व या व्यवहाराची रक्कम बुडा कमिशनरने ठरविल्याचे धक्कादायक वक्तव्य केले आहे. त्यामुळे या खादरवाडीच्या …
Read More »समिती कार्यकर्त्याचा प्रामाणिकपणा; सापडलेले पाकीट मूळ मालकाला परत
बेळगाव : तिसरे रेल्वे गेट येथील ओव्हर ब्रिजवरील रस्त्यावर सापडलेले पैशाचे पाकीट भारतनगर, शहापूर येथील महाराष्ट्र एकीकरण समितीचे निष्ठावंत कार्यकर्ते श्रीधर खन्नूकर यांनी प्रामाणिकपणे मूळ मालकाला परत केल्याची घटना आज सोमवारी दुपारी घडली. याबाबतची थोडक्यात माहिती अशी, एस. एम. खन्नूकर असोसिएट्सचे श्रीधर मोनाप्पा खन्नूकर हे आज दुपारी आपली सर्व्हिसिंगला …
Read More »रुद्रेश यडवण्णावर आत्महत्या प्रकरणाला कलाटणी; आत्महत्या नसून हत्या?
बेळगाव : बेळगाव तहसीलदार कार्यालयात आत्महत्या केलेल्या एसडीए कर्मचारी रुद्रेश यडवण्णावर यांच्या आत्महत्या प्रकरणाला नवी कलाटणी मिळाली आहे. याबाबत खडेबाजार डीएसपीकडे एक अनामिक पत्र आले असून, त्यात रुद्रेश यांची आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा करण्यात आला आहे. बेळगाव तहसीलदार कार्यालयात एसडीए कर्मचारी रुद्रेश यडवण्णावर यांच्या आत्महत्येच्या प्रकरणाला एक नवी …
Read More »बेळगाव शहरात संत श्रेष्ठ कनकदास जयंती साजरी
बेळगाव : संतश्रेष्ठ कनकदास यांच्या जयंतीनिमित्त बेळगाव शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, महानगरपालिका, कन्नड आणि सांस्कृतिक विभागाच्या वतीने आज बेळगावात संतश्रेष्ठ कनकदास यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. श्री अमरेश्वर महाराज यांच्या दिव्य उपस्थितीत महापौर सविता कांबळे, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर …
Read More »चलवेनहट्टी येथे स्वागत कमानीचे उद्घाटन थाटात संपन्न
बेळगाव : चलवेनहट्टी येथे गावच्या प्रवेशद्वारावरील स्वागत कमानीचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात संपन्न झाले. आजी – माजी सैनिक संघटनेच्या स्वखर्चाने स्वागत कमान उभे करण्यात आली आहे. या उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आजी-माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष कृष्णा पाटील हे व्यासपीठ उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत अध्यक्ष अमृत मुद्दनेवर …
Read More »सांबरा विमानतळाजवळ युवकाची दगडाने ठेचून हत्या; पोलिसांकडून तपास सुरू
बेळगाव : सांबरा विमानतळाजवळ सोमवारी पहाटे एका युवकाची क्रूरपणे दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. या धक्कादायक घटनेनंतर परिसरात खळबळ माजली असून, पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे. मृताच्या खिशात दुचाकीची किल्ली सापडल्याने, पोलिसांच्या तपासाला नवे वळण मिळाले आहे. सोमवारी पहाटे बेळगाव जिल्ह्यातील सांबरा विमानतळाच्या कडेच्या शेतात एका …
Read More »बक्कापाची वारी विकण्यासाठी पुढाकार घेतलेल्या दलालांनी आजच्या बैठकीला उपस्थित रहावे; अन्यथा घरासमोर निदर्शने
बेळगाव : बक्कापाची वारी विकण्यासाठी जे दलाल पुढे आलेले त्यांनी शेतकऱ्यांच्या नावे करायचे पैसे जमा न केल्यामुळे गावामध्ये शेतकरी संघटनेच्या माध्यमातून भव्य अशी निषेध फेरी घेण्यात आली. यामध्ये गावातील हजारोंच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. त्याचबरोबर वारी विकणाऱ्या दलालांना खादरवाडीच्या शेतकऱ्यानी चांगलाच इशारा दिलेला आहे. त्यांनी आज सोमवार रात्री ठीक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta