Sunday , July 26 2026
Breaking News

पंढरपूर येथे बेळगावच्या तरुणाचे निधन

Spread the love

 

बेळगाव : वडगाव सोनार गल्लीमधील एका तरुणाचे पंढरपूरमध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. सदर घटना बुधवारी (दि. १७) सकाळी दहा वाजता घडली. प्रवीण सुतार असे त्यांचे नाव आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, प्रवीण वडगाव परिसरातील वारकऱ्यांना घेऊन आपल्या वाहनातून पंढरपूर येथे दर्शनासाठी गेले होते. सकाळच्या सत्रात आपली कामे आटोपून ते आपल्या पार्क केलेल्या वाहनात बसले होते. यादरम्यान त्यांचे हृदयाघाताने निधन झाले. वारकरी दर्शन संपवून पार्क केलेल्या वाहनाकडे आल्यानंतर त्यांना हा प्रकार निदर्शनास आला. या घटनेने वडगाव परिसरातील वारकऱ्यांवर शोककळा पसरली.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *