बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील वंटमुरी गावात एका महिलेला अर्धनग्न अवस्थेत बेदम मारहाण झाल्याची घटना गेल्या वर्षी घडली होती अशीच घटना बेळगाव शहरातील वडरवाडी येथे घडली. बेळगाव येथील वडरवाडी येथे वेश्याव्यवसायाच्या आरोपावरून महिला व तिच्या मुलीला शेजाऱ्यांनी मारहाण करून त्यांचे कपडे फाडले. वडरवाडी येथे आई आणि मुलगी एकाच घरात राहतात. …
Read More »LOCAL NEWS
भाजपच्या असंतुष्ट नेत्यांची बंगळूरात पुन्हा बैठक
विजयेंद्र यांचा चतुराईने पलटवार बंगळूर : बसनगौडा पाटील यत्नाळ आणि असंतुष्ट छावणीतील प्रमुख नेत्यांची १५ नोव्हेंबर रोजी माजी आमदार कुमार बंगारप्पा यांच्या निवासस्थानी बैठक झाली. वक्फच्या प्रश्नाबाबत जनजागृती करणे हा या बैठकीचा उद्देश होता. मात्र भाजप प्रदेशाध्यक्ष किंवा हायकमांडला त्यांनी याबाबत विश्वासत घेतले नव्हते. बैठकीनंतर यत्नाळ म्हणाले, “वक्फबाबत आम्ही …
Read More »येळ्ळूर विभाग म. ए. समितीच्या रोहित आर. पाटील यांना शुभेच्छा
बेळगाव : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024, तासगाव मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गटाचे) अधिकृत उमेदवार मा. स्व. आर. आर. आबा पाटील यांचे चिरंजीव सीमावासीयांच्या निकट असणारे रोहित आर. आर. पाटील यांची आज तासगाव येथे असणाऱ्या जाहीर सभेमध्ये शरदचंद्रजी पवार यांच्या उपस्थितीत बेळगाव महाराष्ट्र एकीकरण समितीचे प्रतिनिधी आणि येळ्ळूर विभाग …
Read More »नार्वेकर गल्लीतील ज्योतिर्लिंग देवस्थानात रविवारी कार्तिक उत्सव आणि महाप्रसाद
बेळगाव : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नार्वेकर गल्ली येथील ज्योतिर्लिंग देवस्थानामध्ये कार्तिक उत्सव साजरा करण्यात येणार आहे. ज्योतिर्लिंग देवस्थानाच्या कार्तिकोत्सवाचे यंदाचे 65 वे वर्ष असून रविवार दिनांक 17 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता कार्तिक उत्सव पार पडणार आहे. त्यानिमित्त सकाळी 8 वाजता होम हवन, 9 वाजता लघुरुद्राभिषेक, 11 वाजता सत्यनारायण पूजा, …
Read More »राष्ट्रवीरकार शामराव देसाई पुरस्कार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांना जाहीर
बेळगाव : पत्रकारिता, शिक्षण, समाजसुधारणा या क्षेत्रात भरीव कार्य केलेले राष्ट्रवीरकार शामराव देसाई यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी पुरस्कार देण्यात येतो. यंदाचा पुरस्कार ज्येष्ठ नेते, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांना जाहीर झाला आहे. पुरस्कार समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पंचवीस हजार रुपये, सन्मानचिन्ह, घोंगडी व पुष्पहार …
Read More »बी के मॉडेल हायस्कूलमध्ये प्रथम विषय मराठी विषयाची कार्यशाळा संपन्न
बेळगाव : बी के मॉडेल हायस्कूलमध्ये प्रथम विषय मराठी विषयाची कार्यशाळा संपन्न. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. एस. एन. जोशी, प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव शहर क्षेत्र शिक्षणाधिकारी माननीय श्री. रवी बजंत्री, एस. एस. एल. सी. नोडल अधिकारी श्री. रिजवान नावगेकर, मराठी फोरम अध्यक्ष श्री. संजय नरेवाडकर, एस. टी. एफ …
Read More »अनगोळ बससेवा पूर्ववत करण्यात यावी; श्रीराम सेना हिंदुस्थान अनगोळतर्फे मागणी
बेळगाव : अनगोळची बससेवा ही गेल्या एक वर्षाहून अधिक काळापासून पूर्णपणे कोलमडली आहे. गावामध्ये बस येत नसल्याने गावातील विद्यार्थी, महिला व नागरिकांना दररोजच मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सदर बससेवा लवकर पूर्ववत करा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा श्रीराम सेना हिंदुस्थान अनगोळतर्फे देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन कर्नाटक राज्य …
Read More »जयश्री फर्निचर युनिट दोनचे आज उद्घाटन
बेळगाव : येथील जयश्री फर्निचर उद्योग समूहाच्या दुसऱ्या युनिटचे उद्घाटन शुक्रवारी (दि. १५) मारुती मंदिर, ब्रह्मनगर, उद्यमबाग येथे होणार असून नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जयश्री फर्निचर उद्योग समूहाचे चेअरमन यल्लाप्पा रेमाण्णाचे यांनी केले आहे. सायंकाळी ४.३० वा. उद्यमबाग येथील डीआयसीचे जॉईंट डायरेक्टर सत्यनारायण भट्ट यांच्या हस्ते उद्घाटन होणार …
Read More »बालदिन पुरस्काराचे वितरण
बेळगाव : जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव सखीच्या माध्यमातून दरवर्षी बालदिन सन्मान पुरस्काराचे वितरण केले जाते. याही वर्षी बाल दिनाचे औचित्य साधून 14 नोव्हेंबर रोजी हे पुरस्कार वितरित करण्यात आले स्व.श्वेता मोहन कारेकर हिच्या स्मरणार्थ दिले जाणारे हे पुरस्कार यंदा महिला विद्यालय हायस्कूलची विद्यार्थिनी समृद्धी प्रकाश सांबरेकर आणि भरतेश हायस्कूलची …
Read More »मराठी विद्यानिकेतनमध्ये बालदिन उत्साहात
बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे शाळेचे क्रीडा शिक्षक दत्ता पाटील यांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे दत्ता पाटील यांनी बालदिन भारतात दरवर्षी 14 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो, हा दिवस मुलांचे हक्क, त्यांचे महत्त्व आणि …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta