Sunday , July 26 2026
Breaking News

म. फुले भाजी मार्केट (झेंडा चौक) व्यापाऱ्यांनी घेतली स्थायी समिती अध्यक्षांची भेट

Spread the love

 

बेळगाव : येथील म. फुले भाजी मार्केटबाबतची माहिती सादर करण्याची सूचना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी महापालिकेला दिली असून, महापालिकेकडून भाजी मार्केटची माहिती तयार करण्यात आली आहे. यासंदर्भात म. फुले भाजी मार्केट (झेंडा चौक) येथील व्यापारी सोमवारी (ता. १५) आयुक्तांची भेट घेण्यास गेले होते. मात्र, त्यांची भेट झाली नाही. यामुळे व्यापाऱ्यांनी महसूल अधिकारी तसेच कायदा सल्लागार यांची भेट घेतली.
बांधकाम स्थायी समितीचे अध्यक्ष जयतीर्थ सौंदत्ती यांचीही भेट घेऊन सदर प्रकरणाची माहिती दिली. सौंदत्ती यांनी प्रकरणावर लक्ष देऊन न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. भाजी मार्केटशी संबंधित सर्व कागदपत्रे, न्यायालयातील दावे व निर्णय अशी सर्व माहिती महापालिकेकडून संकलित करण्यात आली आहे. म. फुले भाजी मार्केटबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे एक तक्रारही दाखल झाली आहे. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून महापालिकेने भाजी मार्केटमधील गाळ्यांचा कब्जा घेतल्याची व महापालिका अधिकाऱ्यांनी दादागिरी केल्याची तक्रार आहे. या तक्रारीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी भाजी मार्केटची सविस्तर माहिती देण्याची सूचना महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांना दिली होती. आयुक्तांनी महसूल विभागाला याबाबतची सूचना केली. त्यानुसार ही माहिती संकलित करण्यात आली आहे. या संदर्भात म. फुले मार्केटमधील व्यापारीवर्ग आयुक्तांनी सोमवारी भेट घेण्यास गेले होते. मात्र, त्यांची भेट होऊ शकली नाही. व्यापाऱ्यांनी बांधकाम स्थायी समितीचे अध्यक्ष जयतीर्थ सौंदत्ती यांची भेट घेऊन भाजी मार्केट संबंधित प्रकरणाची माहिती दिली. यावेळी मध्यवर्ती मार्केट व्यापारी बंधू संघटनेचे अध्यक्ष विकास कलघटगी यांच्यातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. म. फुले भाजी मार्केटचा वाद अनेक महिन्यांपासून सुरू आहे. भाजी मार्केटवर अनेकांनी मालकी हक्काचा दावा केला आहे. त्याबाबतचे दावे न्यायालयात प्रलंबित आहेत, पण एका कुटुंबाकडून थेट भाजी मार्केटवर मालकीचा फलक लावला आहे. याविरोधात व्यापारीवर्गाने जिल्हा पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *