Sunday , September 20 2026
Breaking News

श्रीक्षेत्र नृसिंहवाडीच्या दत्त मंदिरात दक्षिणद्वार सोहळा संपन्न

Spread the love

 

मंदिरात स्नान करण्यासाठी भाविकांची गर्दी

कोल्हापूर : नृसिंहवाडी दत्त मंदिरात मंदिराच्या गाभाऱ्यात पहाटे 4 वाजता पाणी गेलं आणि दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला. कोल्हापुरातील शेकडो भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घेतला. कृष्णा नदीतील पाण्याने पहाटे 4 वाजता श्रींच्या पादुकांना स्पर्श केला आणि पाणी दक्षिणदार द्वारातून बाहेर पडल्याने दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला. यावेळी दिंगबरा दिंगबरा असा जयघोष करत भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

मंदिरात पाणी आल्याने दक्षिणद्वार सोहळा संपन्न
मागील आठवड्याभरापासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून अनेक ठिकाणी पंचगंगा पात्राबाहेर वाहत आहे. शिरोळ तालुक्यातील श्रीक्षेत्र नृसिंहवाडीमध्ये पंचगंगा आणि कृष्णा नदीचा संगम होतो. यामुळे दरवर्षी पाणी वाढलं की नदीचं पाणी येथील श्रीक्षेत्र दत्त मंदिरात शिरत असतं. यंदा 16 जुलै रोजी पहाटे 4 वाजता नदीचं पाणी दत्त मंदिरात आलं आहे. यामुळे यावर्षीचा पहिला दक्षिणद्वार सोहळा पहाटेच्या सुमारास मोठ्या उत्साहात पार पडला.

दक्षिणद्वार सोहळ्यानंतर मंदिरात स्नानासाठी भाविकांची गर्दी
नृसिंहवाडी दत्त मंदिरात दक्षिणद्वार सोहळा जल्लोषात पार पडला, यानंतर मंदिरात स्नान करण्यासाठी भाविकांची एकच गर्दी झाली होती. दिगंबरा दिगंबरा अशा जयघोषात भविकांनी या पाण्यात स्नानं केलं. कृष्णा आणि पंचगंगा या दोन्ही नद्यांची पाणी पातळी सध्या स्थिर आहे, त्यामुळे परिसरात इतका धोका नाही. पावसाचा जोर काहीसा ओसरल्याने कृष्णा आणि पंचगंगा या दोन्ही नद्यांची पाणी पातळी सध्या स्थिर आहे. तरीही कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंदिर परिसरात बंदोबस्त तैनात आहे.

About Belgaum Varta

Check Also

ग्रामीण भागातील महिला कारागिरांच्या हस्तनिर्मित वस्तूंना हक्काचे व्यासपीठ

Spread the love  “कलापुरीचे कलादालन” करवीरवासीयांच्या सेवेत रुजू कोल्हापूर : सौ. अपर्णा चव्हाण व श्री. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *