Sunday , July 26 2026
Breaking News

डिजिटल न्यूज असोसिएशन सदस्यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

Spread the love

 

बेळगाव : बेळगावातील डिजिटल न्यूज असोसिएशन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत केले तसेच त्यांच्या समवेत विविध मुद्द्यांवर चर्चा केली. डिजिटल न्यूज असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना डिजिटल पत्रकारीते संदर्भात आवश्यक असणाऱ्या मुद्द्यांबाबत विवेचन केले. त्यानंतर बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, सध्याच्या युगात डिजिटल न्यूजने नवी क्रांती घडविली आहे. समाजातील अनेक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी डिजिटल पत्रकारिता सक्षमतेने कार्यरत आहे. याची आपणाला जाणीव आहे. आपण या संदर्भात संघटनेच्या कार्याचे कौतुक करतो असे ते म्हणाले. नूतन जिल्हाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी डिजिटल न्यूज असोसिएशन संघटनेचे पदाधिकारी रतन गवंडी, इकबाल जकाती, एस. कृष्णा, महादेव पवार, दीपक सुतार, उपेंद्र बाजीकर, प्रकाश बिळगोजी आणि इतर सदस्य उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *