Tuesday , December 16 2025
Breaking News

LOCAL NEWS

जगदीश शेट्टर यांच्या उमेदवारीवरून बेळगावमध्ये भाजप कार्यकर्त्यांची “गो बॅक शेट्टर” मोहीम

  बेळगाव : जगदीश शेट्टर यांना बेळगाव लोकसभेचे तिकीट मिळणार असल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर तिकीटासाठी इच्छुक असलेल्या स्थानिक नेत्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर ‘गो बॅक शेट्टर’ मोहीम सुरू केली आहे. ‘आमचे मत त्यांच्यासाठी’ आणि ‘सत्तेसाठी पक्ष सोडून गेलेल्यांसाठी मैदान सोडणे मोठे नाही’ अशा घोषणा त्यांनी फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पसरवल्या आहेत. …

Read More »

सीमाभाग युवा सेनेची बेळगावात पहिली आढावा बैठक पार

  बेळगाव : डॉ. सतीश नरसिंग यांची युवा सेना सीमाभागाच्या विस्तारक पदी निवड झाल्याबद्दल बेळगावमध्ये त्यांचे अभिनंदन करण्यात आले. येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या युवा सेनेची संपुर्ण सीमाभागातील व्यापक बैठक बेळगावमधील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात पार पडली. यावेळी बेळगाव, निपाणी, खानापुर, चिक्कोडी अशा बेळगाव जिल्ह्यातील …

Read More »

नूतन पोलीस आयुक्तांचे गणेशोत्सव महामंडळाच्यावतीने स्वागत

  बेळगाव : बेळगाव सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आज मंगळवारी शहराचे नूतन पोलीस आयुक्त इडा मार्टिन मार्बनिंग यांचे शहरातील समस्त गणेश भक्तांच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.   बेळगावचे पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा हे गेल्या 29 फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांच्या जागी 2009 बॅचचे आयपीएस अधिकारी इडा मार्टिन मार्बलिंग …

Read More »

बुद्धीबळ शिकू इच्छिणाऱ्यांना सुवर्णसंधी : चेकमेट स्कूल ऑफ चेसतर्फे दोन दिवशीय मोफत बुद्धीबळ प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

  बेळगाव (प्रतिनिधी) : चेकमेट स्कूल ऑफ चेस, बेळगाव या बुद्धिबळाचा खेळ शिकविणाऱ्या बुद्धिबळ संघटनेच्यावतीने दोन दिवशीय मोफत बुद्धिबळ प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दिनांक 22 आणि शनिवार दिनांक 23 मार्च असे दोन दिवस बेळगाव शहर आणि उपनगरात पाच ठिकाणी हे शिबिर चालणार आहे. गोवावेस येथील गोवावेस स्विमिंग …

Read More »

बेल्लांदूर येथे एका शाळेच्या आवारात सापडली स्फोटके

  बंगळुरू : नुकताच रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणाने संपूर्ण बंगळुरूला हादरवून सोडले होते आणि त्यातच आज सकाळी सर्जापूर रोडवर बेल्लांदूर येथील एका शाळेच्या आवारात स्फोटके सापडली. बेल्लांदूर येथील प्रक्रिया शाळेसमोरील रिकाम्या जागेत जिलेटिन स्टिक, डिटोनेटर आणि इतर स्फोटके एका ट्रॅक्टरमध्ये स्फोटके सापडल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर स्फोटके …

Read More »

हिंडाल्को परिसरात पट्टेरी वाघाचे दर्शन?

  बेळगाव : शहरातील हिंडाल्को कारखान्याजवळ दि. 18 रोजी रात्री 10 वाजता पट्टेरी वाघाचे दर्शन झाल्यामुळे कारखान्यातील कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता पायाचे ठसे पाहिल्यानंतर ती वाघीण असल्याचे आढळून आले. वन्य प्राण्यांचे शहरात वारंवार आगमन होत असून बेळगाव शहरात गेल्या आठवड्यात गजराजाचे दर्शन …

Read More »

काँग्रेसने कर्नाटकला आपले एटीएम बनवले : पंतप्रधान मोदी

  शिमोगा येथे जाहीर सभेत घणाघात बंगळूर : काँग्रेसने दक्षिणेकडील राज्य आपले एटीएम बनवले आहे. प्रत्येक निवडणुकीपूर्वी काँग्रेस खोटे बोलण्यात माहिर बनते आणि कर्नाटकातही तेच करत आहे, असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार आरोप केला. ते शिमोगा येथे सोमवारी भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. शिमोगा येथे जाहीर सभेला …

Read More »

हाॅकी ॲस्ट्रोटर्फ मैदानाची मागणी; मैदानाचे पालकमंत्र्यांचे आश्वासन

  बेळगाव : बेळगावने भारताला चार ऑलिंपिक हाॅकी खेळाडू दिले परंतु कर्नाटक शासनाने बेळगावसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे हाॅकी मैदान अद्याप दिलेले नाही, यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने हाॅकी बेळगाव संस्थेची ॲस्ट्रोटर्फ मैदानाची मागणी पूर्णत्वास न्यावी असे निवेदन संस्थेतर्फे सचिव सुधाकर चाळके यांनी आज पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना दिले. बेळगांव हे हाॅकी प्रेमींचे …

Read More »

नूतन पोलीस आयुक्त लाडा मार्टिन यांनी पदभार स्विकारला

  बेळगाव : गेल्या महिन्यात डॉ. सिद्धरामप्पा हे सेवानिवृत्त झाल्यानंतर बेळगाव पोलीस आयुक्त पद रिक्त झाले होते. त्या पदावर लाडा मार्टिन यांची नियुक्ती करण्यात आली. दरम्यान लाडा मार्टिन मरबनियांग यांनी आज सोमवारी बेळगाव पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला आहे. मूळचे मेघालयचे असणारे मार्टिन यांनी 2009 साली आयपीएस अधिकारी बनल्यानंतर गुलबर्गा, …

Read More »

कन्नड फलक प्रकरणी; जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या मनपा आयुक्तांना सूचना

  बेळगाव : बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे नामफलकावरील 60 टक्के कन्नड सक्तीसाठी केली जाणारी जबरदस्ती आज सोमवारपासून तात्काळ थांबवण्यात येईल असे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले असून तशी सूचना त्यांनी महापालिका आयुक्तांनाही दिली आहे. यामुळे शहरातील दुकानदार, व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. अलीकडे बेळगाव शहरात नामफलकावरील कन्नड सक्तीचा …

Read More »