Sunday , December 14 2025
Breaking News

LOCAL NEWS

343 वा संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा बेळगावात मोठ्या उत्साहात साजरा

  बेळगाव (प्रतिनिधी) : स्वराज्य आणि धर्मनिष्ठा जोपासुन शुरविर संभाजीराजेंनी मुघल साम्राज्याशी कडवी झुंज देत 120 युद्ध खेळून ती जिंकली आणि मराठेशाहीचे अस्तित्व अबाधीत ठेवत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारे स्वराज्य घडविण्यांत शूरवीर संभाजीराजे यांनी मोलाचे योगदान दिले असे प्रतिपादन भाजपाचे राज्य उपाध्यक्ष माजी आमदार अनिल बेनके यांनी केले. धर्मवीर …

Read More »

भाजपच्या नुतन ३९ जिल्हाध्यक्षाची नियुक्ती

  बेळगाव शहराध्यक्षपदी गीता सुतार, बेळगाव ग्रामीण अध्यक्षपदी सुभाष पाटील; चिक्कोडीच्या अध्यक्षपदी अप्पाजीगोळ यांची वर्णी बंगळूर : राज्य भाजपने जिल्हा शाखासाठी नवीन अध्यक्षांची नियुक्ती केली आहे. प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी ३९ संघटनात्मक जिल्ह्यांसाठी अध्यक्षांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला आहे. बेळगाव शहर अध्यक्षपदी गीता सुतार, बेळगाव ग्रामीणच्या अध्यक्षपदी सुभाष पाटील, …

Read More »

बेळगावचा हॉकी संघ म्हैसूरला अ.भा. निमंत्रित कपसाठी रवाना

  बेळगाव : हॉकी बेळगावचा संघ हॉकी म्हैसूर येथे आयोजित 18 ते 21 जानेवारी दरम्यान अखिल भारतीय निमंत्रित कपसाठी आज निवड करण्यात आला. संघाला शुभेच्छा देण्यासाठी लेले मैदानावर समारंभ आयोजित करण्यात आला होता, तसेच यावेळी हॉकी बेळगावतर्फे खेलो इंडिया स्पोर्ट्स अथाॅरिटी आॕफ इंडिया हॉस्टेलसाठी 10 मुलींची मडीकेरी येथील निवड चाचणीसाठी …

Read More »

विवेकानंद सौहार्द को-ऑप. सोसायटीतर्फे स्वामी विवेकानंद जयंती साजरी

  बेळगाव : येथील कॉलेज रोडवरील नामांकित विवेकानंद सौहार्द सहकारी सोसायटीच्या वतीने 12 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधून ऑस्ट्रेलिया येथील अभ्यास दौरा यशस्वी करून आलेली स्नेहा रामचंद्र एडके हिचा यावेळी सत्कार करण्यात आला. व्हाईस …

Read More »

गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे उद्घाटन

  बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीच्या वतीने दिनांक 14 जानेवारी ते 28 जानेवारी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा केला जाणार आहे. राज्य मराठी विकास संस्था व महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग यांच्या वतीने सुचित केल्याप्रमाणे या भाषा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पंधरवड्याचा उद्घाटन सोहळा मराठी …

Read More »

शिल्पकार योगीराज यांच्या ‘राम लल्ला’ मूर्तीची होणार प्रतिष्ठापना

  श्री रामजन्मभूमी ट्रस्टची अधिकृत घोषणा बंगळूर : अयोध्येतील राम मंदिरातील ‘राम लल्ला’ मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेबाबत आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे, ज्याची संपूर्ण देश आतुरतेने वाट पाहत आहे. म्हैसूरचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी साकारलेली ‘राम लल्ला’ मूर्तीची २२ जानेवारी रोजी होणाऱ्या समारंभात प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार असल्याची श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राने …

Read More »

कर्नाटकात संक्रांतीच्या दिवशी अपघातांची मालिका; १५ जण ठार

  बेंगळुरू : कर्नाटक राज्यात संक्रमण सणाच्या दिवशी अपघातांची मालिका घडली. एकाच दिवशी झालेल्या वेगवेगळ्या अपघातात एकूण १४ जणांचा मृत्यू झाला. विजयनगर, चामराजनगर, बंगळुरू, दावणगेरेसह विविध जिल्ह्यांमध्ये अपघातांची मालिका घडली. दावणगेरे येथे बोलेरो वाहन पलटी झाल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. शिमोगा जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील चंदनकेरे येथील नागराज (३८), गौतम …

Read More »

पै. महेश लंगोटी, पै. प्रिसिटा सिध्दी ‘बेळगाव केसरी वन’चे मानकरी

  बेळगाव : बेळगाव मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेतर्फे आयोजित गुणांवर आधारित मॅटवरील कुस्ती स्पर्धेतील मानाचा ‘बेळगाव केसरी वन’ हा किताब पुरुष गटात पै. महेश लंगोटी याने तर महिला गटात हल्याळच्या पै. प्रिसिटा सिद्धी हिने पटकाविला. त्याचप्रमाणे ‘बेळगाव तालुका बाल केसरी’ किताब मुलांच्या गटात पै. गगन पुनजगौडा आणि मुलींच्या गटात पै. प्रांजल …

Read More »

हुतात्मा दिनी व्यंगचित्रांचे प्रदर्शन!

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने दिनांक 17 जानेवारी 2024 रोजी सकाळी 9:30 वाजता हुतात्मा चौक बेळगाव येथे संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या लढ्यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना वंदन करण्यात येणार आहे. या अभिवादन कार्यक्रमास बेळगाव मधील मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्या वतीने करण्यात आले …

Read More »

मराठी भाषिक विद्यार्थ्यांनी व्याख्यानमालेचा लाभ घेऊन दहावीच्या परीक्षेत प्राविण्य मिळवावे : आर. एम. चौगुले

  हिंडलगा : गेल्या सात वर्षांपासून आम्ही मण्णूर येथे कै. एम. डी. चौगुले सामाजिक आणि शैक्षणिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमालेचे आयोजन करीत आलो आहोत. मराठी भाषिक विद्यार्थ्यांनी या व्याख्यानमालेचा लाभ घेऊन दहावीच्या परीक्षेत प्राविण्य मिळवावे असे प्रतिपादन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष युवा नेते आर. एम. चौगुले यांनी केले. वेगवेगळ्या …

Read More »