Sunday , December 14 2025
Breaking News

LOCAL NEWS

भाजप प्रदेश उपाध्यक्षपदी अनिल बेनके यांची निवड झाल्याबद्दल क्षत्रिय मराठा परिषदेच्यावतीने सत्कार

  बेळगाव : भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी माजी आमदार अनिल बेनके यांची निवड झाल्याबद्दल क्षत्रिय मराठा परिषदेच्या बेळगाव जिल्हा व तालुका शाखेतील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सत्कार केला. सत्कारावर प्रतिक्रिया देताना अनिल बेनके म्हणाले, बेळगाव जिल्ह्यात मराठा समाजाची संख्या सर्वाधिक आहे. मराठा समाजाच्या मागण्यांची मला जाणीव आहे. त्यादृष्टीने मराठा …

Read More »

येळ्ळूर व मच्छे शिवारामध्ये समाजकंटकांकडून गवत गंज्यांना आग

  येळ्ळूर : येळ्ळूर व मच्छे शिवारामध्ये समाजकंटकांकडून शेतकऱ्यांच्या भात गंजींना तसेच गवत गंज्यांना आग लावण्याचे प्रकार गुरुवारी रात्री घडले आहेत. या घटनेत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. येळ्ळूर येथील कोंडी शिवारामध्ये गंगाधर पाटील, उमेश पाटील यांच्या मोठ्या भात गंज्यांना आगी …

Read More »

राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

  हुबळी : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील हुबळी नजीक दोन कार आणि लॉरी यांच्यात भीषण अपघात झाला असून त्यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.याबाबत समजलेली माहिती अशी की, एक कार हासनहून गोव्याला जात होती. तर दुसरी कार बेंगळुरूहून शिर्डीला जात होती. या दोन कारमध्ये अपघात झाला आणि नंतर त्यातील एक …

Read More »

सूर्य, चंद्र असेपर्यंत आर्ष परंपरा कायम राहणार : स्वस्ति जिनसेन भट्टारक महास्वामी

  बोरगाव येथे देवी मूर्ती प्रतिष्ठापना निपाणी (वार्ता) : प्राचीन काळापासून जैन धर्मात देवी, देवता यक्ष्य,यक्षणी यांना मोठे स्थान आहे. जिनेन्द्र भगवंतांच्या समोवशरणामध्ये देवींना पूजा व अलंकाराचे स्थान आहे. चारित्र चक्रवर्ती शांतीसागर महाराजांनी संपूर्ण भारतभर फिरून जैन धर्मा मधील मुनी परंपरा दाखवली. प्राचीन काळापासून इतिहास असलेल्या जिनधर्म अबाधित राहणार असून …

Read More »

बेळगावात अमली पदार्थांविरोधात पोलिसांकडून जनजागृती रॅली

  बेळगाव : बेळगाव पोलीस आयुक्तालयातर्फे “व्यसनमुक्त बेळगाव शहर” अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत अमली पदार्थांविरोधात आज शहरात जनजागृती रॅली काढण्यात आला. अमली पदार्थ आणि व्यसनांपासून दूर राहिल्याने चांगले जीवन जगू शकता, असे शहर पोलिस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा यांनी यावेळी सांगितले. बेळगाव पोलीस आयुक्तालयातर्फे आज, शुक्रवारी शहर पोलीस आयुक्त …

Read More »

श्रीकांत पुजारीला सशर्त जामीन मंजूर

  हुबळी : हुबळी दंगल प्रकरणातील आरोपी श्रीकांत पुजारीला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. हुबळी येथे 1992 मध्ये झालेल्या दंगली आणि दुकानाला आग लावल्याप्रकरणी आरोपी श्रीकांत पुजारी याला हुबळी पोलिसांनी 29 डिसेंबर रोजी अटक केली होती. ३१ वर्षांपूर्वी घडलेले प्रकरण पुन्हा उघडण्यात आले असून कारसेवकाला अटक करण्यात आल्याचे सांगत राज्य …

Read More »

नियती फाउंडेशनतर्फे कांचन पाटीलला शैक्षणिक शिष्यवृत्ती

  बेळगाव : बेळगावातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि भाजप नेत्या सोनाली सरनोबत यांच्या नियती फाऊंडेशनतर्फे नर्सिंग कॉलेजची गुणवंत विद्यार्थिनी कांचन पाटील हिला दहा हजार रुपयांची शैक्षणिक शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. डॉ. सोनाली सरनोबत, डॉ. समीर सरनोबत यांच्यासह कांचन हीचे पालक यावेळी उपस्थित होते. कांचन ही डॉ. रवी पाटील नर्सिंग कॉलेजमध्ये नर्सिंग …

Read More »

मतिमंद मुलीवर बापाकडून अत्याचार; बेळगावात आणखी एक घृणास्पद कृत्य

  बेळगाव : मतिमंद मुलीवर बापानेच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बेळगावातील बेळवट्टी गावात ही घटना घडली असून बापाने केलेल्या या कृत्यामुळे सदर मुलगी गरोदर झाली आणि तीने एका मुलाला जन्म दिला आहे. आई गमावलेल्या मानसिक आजारी मुलीवर बापाकडून घरात सतत अत्याचार होत होता. सदर मतिमंद तरुणी गरोदर राहिल्यानंतर स्थानिकांना संशय …

Read More »

विवाह सोहळ्यातील लाखांचा ऐवज लंपास करणारा चोरटा अटकेत

  बेळगाव : विवाह सोहळ्यास आलेल्या महिलेची सोन्याची दागिने व पैसे असा 3 लाख 51 हजार रुपयांचा ऐवज असलेली व्हॅनिटी बॅग लंपास करणाऱ्या चोरट्याला माळमारुती पोलिसांनी शिताफीने पकडून त्याच्याकडील चोरीचा ऐवज जप्त केला आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नांव इम्तियाज मोहम्मदगौस हुबळीवाले (वय 63, रा. वीरभद्रनगर बेळगाव) असे आहे. याबाबतची …

Read More »

पायोनियर बँकेच्या दोन संचालकांचे संचालकपद रद्द

  बेळगाव : येथील दि. पायोनियर अर्बन को-ऑप. बँकेच्या दोन विद्यमान संचालकांचे संचालक पद रद्द करण्याचा आदेश सहकारी खात्याच्या निबंधकाकडून आला आहे. बँकेच्या इतिहासात हे पहिल्यांदाच होत असल्याने खळबळ माजली आहे. याबाबतचे वृत्त असे की बँकेचे संचालक रवी अर्जुन दोडन्नावर आणि लक्ष्मी दत्ताजी कानूरकर हे संचालक मंडळाच्या तीन बैठकीना सलग …

Read More »