Sunday , July 26 2026
Breaking News

विवाह सोहळ्यातील लाखांचा ऐवज लंपास करणारा चोरटा अटकेत

Spread the love

 

बेळगाव : विवाह सोहळ्यास आलेल्या महिलेची सोन्याची दागिने व पैसे असा 3 लाख 51 हजार रुपयांचा ऐवज असलेली व्हॅनिटी बॅग लंपास करणाऱ्या चोरट्याला माळमारुती पोलिसांनी शिताफीने पकडून त्याच्याकडील चोरीचा ऐवज जप्त केला आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नांव इम्तियाज मोहम्मदगौस हुबळीवाले (वय 63, रा. वीरभद्रनगर बेळगाव) असे आहे.
याबाबतची माहिती अशी की, माळमारुती पोलीस ठाण्याच्या व्याप्तीतील विद्याधिराज कल्याण मंडपामध्ये काल शुक्रवारी एक विवाह सोहळा होता.
या सोहळ्यास आलेल्या दावणगिरी येथील पंचाक्षरी एम के यांच्या पत्नीच्या व्हॅनिटी बॅग मधील सुमारे 3 लाख 51 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख 3500 रुपयांची रक्कम असा एकूण 3 लाख 54 हजार 500 रुपयांचा ऐवज कोणा अज्ञाताने व्हॅनिटी बॅगसह लंपास केला होता.
याप्रकरणी तक्रार दाखल होताच माळमारुती पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून व्हॅनिटी बॅग चोरणाऱ्या इम्तियाज हुबळीवाले याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली. तसेच चोरीचा ऐवज पोलिसांकडे सुपूर्द केला. याप्रकरणी माळमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

Spread the love  बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *