Monday , September 21 2026
Breaking News

रोहित पवारांच्या बारामती ऍग्रोवर ईडीची छापेमारी, 6 ठिकाणी तपास सुरु

Spread the love

 

पुणे : बारमती ऍग्रो कथित गैरव्यावहार प्रकरणी मुंबईसह सहा ठिकाणी ईडीने छापेमारी केली आहे. आमदार रोहित पवार यांच्या बारमती ऍग्रो कंपनीवर केंद्रीय तपास यंत्रणांनी आज छापेमारी केली. सकाळपासून बारामती ऍग्रोच्या सहा कार्यालयावर ईडीकडून तपास करण्यात येतोय. गेल्या वर्षी रोहित पवार यांना याबाबत नोटीस आली होती. आता त्यांच्या कंपनीवर छापेमारी करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ईडीने छापेमारी केल्यानंतर कंपनीत इतर कुणालाही प्रवेश देण्यात येत नाही.

आमदार रोहित पवार यांनी याबाबत सूचक वक्तव्य केलेय. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलेय की, “हा आहे स्वाभिमानी महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांचा चेहरा. ज्यांनी पिढ्यान् पिढ्या महाराष्ट्र धर्म जपला आणि वाढवला. अन्यायाविरोधात प्रसंगी संघर्ष करण्याची शिकवणही या महान विभूतींनी दिल्याने महाराष्ट्र भूमीला संघर्षाचाही प्रदीर्घ इतिहास आहे. म्हणून मराठी माणूस या नात्याने महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी आणि टिकवण्यासाठी प्रत्येकाला संघर्षाचीही तयारी ठेवावी लागेल…”

बारामती ऍग्रो कंपनीवर केंद्रीय तपास यंत्रणेची धाड टाकल्याची सूत्रांची माहिती आहे. बारामती ऍग्रो कंपनी ही आमदार रोहित पवारांची कंपनी आहे. बारामती तालुक्यातील पिंपळी येथील बारामती ऍग्रोच्या कंपनी आहे, आज सकाळी तपास यंत्रणा येथे पोहोचली. सकाळी आठ ते साडे आठच्या दरम्यान हे अधिकारी येथे पोहोचले आहेत. तेव्हा पासून चौकशी सुरू आहे. त्याशिवाय मुंबईसह इतर ठिकाणीही धाडी मारल्या आहेत.

दरम्यान, रोहित पवार यांना गेल्यावर्षी बारामती ऍग्रो कंपनीतील कथित गैरव्यावहार प्रकरणी नोटीस मिळाली होती. याप्रकरणी रोहित पवार यांनी दोन मोठ्या नेत्यांवर निशाणा साधला होता. त्यांच्या सांगण्यावरुन माझ्या कंपनीत छापेमारी झाल्याचं ते बोलले होते.

About Belgaum Varta

Check Also

जयसिंगपुरात आईने दोन चिमुरड्या मुलांचा जीव घेतला; त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love  जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शहरात शनिवारी रात्री मन हेलावून टाकणारी घटना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *