बेळगाव (प्रतिनिधी) : बेळगाव नगरीचा सुपुत्र आणि विजया क्रिकेट अकॅडमी व हुबळी क्रिकेट अकादमी यांचा अष्टपैलू क्रिकेटपटू मनीकांत शिवानंद बुकिटगार याची कर्नाटक संघाच्या उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. विनू मंकड करंडक देहरादून येथे ९ ते १७ ऑक्टोबर यादरम्यान खेळवण्यात येणार आहे. मनीकांत याने गतवर्षी कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या वरिष्ठांच्या …
Read More »LOCAL NEWS
राज्यातील 27 पोलीस उपअधीक्षक व 131 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या
बेळगाव : राज्यातील 27 पोलीस उपअधीक्षक व 131 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सोमवारी सायंकाळी राज्य सरकारने बदल्यांचा आदेश जारी केला असून यामध्ये बेळगाव शहर व जिल्ह्यातील काही अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. शहापूरचे पोलीस निरीक्षक सिद्धाप्पा सीमानी यांची कर्नाटक लोकायुक्त विभागात बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर संतोषकुमार डी. यांची …
Read More »सरकारी आणि अनुदानित शाळांची दसऱ्याची सुट्टी 18 ऑक्टोबरपर्यंत वाढविली
बंगळूर : राज्यातील सर्व सरकारी आणि अनुदानित शाळांना दसऱ्याची सुट्टी आता १८ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत हा निर्णय जाहीर केला. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, कायमस्वरूपी मागासवर्ग आयोगातर्फे राज्यात सुरू असलेले सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण काही ठिकाणी अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळातील …
Read More »सरन्यायाधिशांवरील हल्ल्याचा माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्याकडून तीव्र शब्दात निषेध
खानापूर : लोकशाही आणि डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाच्या मूल्यांना आधार मानून वाद-प्रतिवादातून न्याय्य भूमिकेकडे जाण्यासाठी न्यायव्यवस्था असते. त्याच न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च संस्थेत मुख्य न्यायमूर्तींवरच अशा प्रकारे हल्ल्याचा प्रयत्न होणं हा केवळ न्यायव्यवस्थेचाच नव्हे तर लोकशाहीचा, संविधानाचा आणि देशाचा घोर अवमान आहे. आपल्या देशात पेरलं जाणारं विष आता संविधानाच्या सर्वोच्च संस्थांनाही …
Read More »कारलगा हट्टी (ता. खानापूर) येथील श्री ब्रह्मदेव मंदिराच्या जीर्णोद्धारास प्रारंभ…
खानापूर : कारलगा हट्टी (तालुका खानापूर) येथील ग्रामदैवत श्री ब्रह्मदेव मंदिराच्या जीर्णोद्धारास सोमवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी प्रारंभ करण्यात आला आहे. ग्रामस्थांच्या सर्वसाधारण बैठकीमध्ये मंदिराच्या जीर्णोद्धारा संदर्भात चर्चा करून एकमताने मंदिर जीर्णोद्धाराचा निर्णय घेण्यात आला व सोमवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी ग्रामदैवत चव्हाटा व ब्रह्मदेव मंदिरात ग्रामस्थांच्या उपस्थितीत गाऱ्हाणे …
Read More »शहापूर येथे रामायण रचनाकार, महर्षी वाल्मिकी जयंती साजरी
बेळगाव : मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांचे आदर्श जीवन आपल्या साहित्यातून सर्वांपर्यंत पोहोचविण्याचे काम महर्षी वाल्मिकी यांनी केले आहे. त्यांचे चरित्र सत्य, प्रेम आणि कर्तव्य पथावर मार्गक्रमण करण्यासाठी सदैव प्रेरणा देते. याच महर्षी वाल्मिकी यांची जयंती आज मंगळवारी बेळगाव शहरात एकमेव असलेल्या शहापूर बॅ.नाथ पै चौक येथील श्री महर्षी …
Read More »जातीय जनगणना: शेवटचा दिवस आला तरी सर्वेक्षण अपूर्णच; आज मुदतवाढीची घोषणा शक्य
बंगळूर : राज्यात २२ सप्टेंबरपासून सुरू झालेले सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने दिलेली अंतिम मुदत उद्या (ता. ७) संपत आहे. अंतिम मुदत जवळ येत असली तरी, सर्वेक्षण अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे सर्वेक्षणाबाबत चिंता वाढत आहे. राज्य मागासवर्ग आयोगाकडून करण्यात येणाऱ्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक …
Read More »भ्रष्ट अधिकाऱ्याला पाठीशी घातल्याबद्दल सत्ताधारी नगरसेवकांकडून प्रशासनाचा निषेध
बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेच्या महसूल उपआयुक्तांविरुद्ध परिषदेच्या सभेत ठराव पास होऊनही, त्यांची दुसऱ्या ठिकाणी बदली न झाल्याने आज बेळगाव महानगरपालिकेच्या मुख्यालयात नगरसेवकांनी धरणे आंदोलन केले. बेळगाव महानगरपालिकेचे महसूल उपआयुक्त यांच्याविरुद्ध अनेक तक्रारी असतानाही, त्यांच्या विरोधात परिषदेच्या सभेत ठराव मंजूर झाला. तरीही त्यांची बदली झाली नाही आणि ते अजूनही सेवेत …
Read More »पत्नीने पतीच्या अंगावर चक्क उकळते तेलच ओतले; मच्छे येथील घटना
मच्छे (ता. बेळगाव) : सतत सुरु असलेल्या घरगुती वादातून संतापलेल्या पत्नीने पतीच्या अंगावर चक्क उकळते तेल ओतल्याची धक्कादायक घटना रामनगर (मच्छे) येथे सोमवारी घडली आहे. या घटनेत पती सुभाष पाटील (वय 55) हे गंभीर भाजल्याने जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पत्नी वैशाली पाटील स्वयंपाक करत असताना किरकोळ …
Read More »जनगणनेसंदर्भात हलगा मराठा समाज सुधारणा मंडळाच्या वतीने जनजागृती
बेळगाव : कर्नाटक सरकारने सुरू केलेले सामाजिक व शैक्षणिक जनगणतेचे काम अंतिम टप्प्यात आले असल्यामुळे हलगा गावातील कोणत्याही नागरिकाची जनगणती चुकू नये यासाठी हालगा मराठा समाज सुधारणा मंडळाच्या वतीने प्रत्येक घरोघरी जाऊन विचारपूस करण्याचे अभियान हाती घेण्यात आली आहे. या अभियानाचा शुभारंभ मराठा समाज सुधारणा मंडळाचे अध्यक्ष यल्लाप्पा सामजी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta