बेळगाव : संपूर्ण कर्नाटकात कर्जाच्या बोजामुळे 43 विणकरांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, असे निवेदन विणकर संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिले. राज्यभरातील विणकर विविध कारणांमुळे आर्थिक संकटात सापडले आहेत, शासनाच्या योजना विणकरांपर्यंत पोहोचत नसल्याने ते वंचित आहेत, विणकरांना असंघटित क्षेत्रातील कामगारांना दिल्या जाणाऱ्या सुविधा …
Read More »LOCAL NEWS
आंबेवाडीत जनावरांना लाळखुरकूत लसीकरण
बेळगाव : बेळगाव ग्रामीण क्षेत्रातील आंबेवाडी गावामध्ये जनावरांना घरोघरी जाऊन लाळखुरकुत लसीकरण करण्यात आले. आंबेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्ता राहुल भातकांडे यांनी विशेष परिश्रम घेत ही लसीकरण मोहीम यशस्वी केली. यावेळी पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रताप हन्नूरकर यांनी आंबेवाडी गावातील शेतकऱ्यांना व पशुपालकांना लाळखुरकत रोगांची लक्षणे व …
Read More »शहापूर पोलीस निरीक्षकपदी सिम्मनी यांची नियुक्ती
बेळगाव : शहापूर पोलीस निरीक्षक पदी एस एस सिम्मनी यांनी बुधवारी पदभार स्वीकारला आहे. मावळते पोलीस निरीक्षक सुनील कुमार यांची अन्यत्र बदली झाली आहे. सिम्मनी यांनी या अगोदर बेळगाव शहरात मार्केट पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्य केले होते. त्यावेळी त्या भागात शांतता प्रस्थापित करण्यात मोलाची भूमिका बजावली होती.
Read More »राज्यात जात जनगणनेचा अहवाल जाहीर करण्यासाठी दबाव
बंगळूर : जात जनगणनेचा अहवाल जाहीर करण्यासाठी दबाव आणला जात असून, यावरून राज्याच्या राजकारणात प्रचंड वादळ निर्माण होणार असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जात जनगणनेचा अहवाल लवकरात लवकर मंजूर करू असे सांगितले असले तरी ही प्रक्रिया लांबण्याची शक्यता आहे. कांतराज आयोगाने तयार केलेला सामाजिक व आर्थिक जात …
Read More »पालकमंत्री सतीश जारकीहोळीना धमकीपत्र देणाऱ्याला कठोर शिक्षा द्या
दलित संघटनांचे आंदोलन: जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर बेळगाव (वार्ता) : जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना धमकीपत्र देणाऱ्या विरोधात कठोर शिक्षा व्हावी. शिवाय याची सीआयडी चौकशी करण्याची मागणी विविध दलित संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. दोन दिवसांपूर्वी अनोळखी व्यक्तींनी पत्र पाठवून जिल्हा पालकमंत्री सतीश जरकीहोळी यांना थेट धमकी दिली आहे. एवढी …
Read More »संघटितपणे संविधानाचा हक्क मिळवणे चूकीचे कसे? : मुख्यमंत्री सिद्धरामय्या
बेळगावातील राष्ट्रीय समावेश मेळाव्यात सत्कार स्विकाताना व्यक्त मत बेळगाव (प्रतिनिधी) : देशातील सर्व समाज एक सारखेच असून, आजपर्यंत आम्हीं कधीही जातीभेद केला नाही. सर्व समाजाला बरोबर घेऊनच चाललो आहोत. सरकार संविधानाच्या चौकटीतच सर्व समाजाना एकच न्याय दिला जाईल, असे सांगत कोणत्याही समाजाने संघटिपणे हक्क मागितला तर त्यात चुकीचे काय …
Read More »दिल्ली -बेळगाव विमानसेवा 5 ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू
बेळगाव : वर्षभरापासून बंद पडलेली दिल्ली -बेळगांव विमानसेवा आता पुन्हा 5 ऑक्टोबर पासून नव्याने सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे बेळगाव ते मुंबई ही विमानसेवा येत्या 15 ऑक्टोबर पासून बेळगावकरांच्या सेवेत असणार आहे. इंडिगो विमान कंपनीने बेळगाव ते दिल्ली विमानसेवा सुरू केली असून या कंपनीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार नवी दिल्ली ते …
Read More »कॅन्टोन्मेंट मराठी प्राथमिक शाळेत ‘ऑपरेशन मदत’ ग्रूपच्या पुढाकाराने प्लास्टिक मुक्तीचे अभियान
बेळगाव : स्वच्छ भारत अभियांनातर्गत ‘ऑपरेशन मदत’ ग्रूप या संस्थेच्या सहकार्याने कॅन्टोन्मेंट शाळेने पर्यावरणाचे संवर्धन ही काळाची गरज आहे ओळखून, शाळेमध्ये प्लास्टिक मुक्तीचे अभियान सुरू केले आहे. संपूर्ण जग हे दिवसेंदिवस प्लास्टिकच्या विळख्यात जखडले जात आहे. त्याच्या दुष्परिणामाची कल्पना विद्यार्थ्यांना बाल वयापासूनच व्हावी व पर्यावरण संवर्धनात विद्यार्थ्यांचाही सहभाग असावा …
Read More »शब्दगंध कवी मंडळातर्फे विद्यार्थ्यांसाठी “शब्दगंध काव्य लेखन स्पर्धेचे” आयोजन
वर्धापन दिनानिमित्त माध्यमिक आणि महाविद्यालयीन अशा दोन गटाकरिता आयोजन बेळगाव : बेळगाव येथील शब्दगंध कवी मंडळ गेली ३३ वर्षे मराठी कविता आणि कवींसाठी कार्यरत आहे. मंडळातर्फे नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून बेळगावातील काव्य परंपरा समृद्ध करण्याचे कार्य करते आहे. ३३व्या वर्धापन दिनानिमित्त ‘शब्दगंध काव्य लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. …
Read More »राज्यात ग्राम न्यायालये स्थापण्याचा गांभिर्याने विचार
सिध्दरामय्या; गांधी ग्राम पुरस्कार वितरण बंगळूर : खेड्यांचे वाद खेड्यातच सोडवले जावेत. या महत्त्वाकांक्षेने सरकारने ग्राम न्यायालये स्थापन करण्याचा गंभीर विचार केल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले. ग्रामीण विकास आणि पंचायत राज विभागातर्फे विधानसौधमधील बँक्वेट हॉल येथे आयोजित २०२३ चा गांधी ग्राम पुरस्कार वितरण आणि स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण राज्यस्तरीय पुरस्कार …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta