Sunday , July 26 2026
Breaking News

आंबेवाडीत जनावरांना लाळखुरकूत लसीकरण

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव ग्रामीण क्षेत्रातील आंबेवाडी गावामध्ये जनावरांना घरोघरी जाऊन लाळखुरकुत लसीकरण करण्यात आले. आंबेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्ता राहुल भातकांडे यांनी विशेष परिश्रम घेत ही लसीकरण मोहीम यशस्वी केली.
यावेळी पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रताप हन्नूरकर यांनी आंबेवाडी गावातील शेतकऱ्यांना व पशुपालकांना लाळखुरकत रोगांची लक्षणे व घ्यावयाची काळजी यासंबंधी मार्गदर्शन केले आणि जनावरांना मोफत लसीकरण करण्यात आले. याप्रसंगी डॉ. शिवाजी चौगुले, डॉ. प्रभाकर तरळे, डॉ. सुहास पाटील उपस्थित होते.
ज्या पशुपालकांनी आपल्या जनावरांना लसीकरण करवून घेतले नाही त्यांनी तात्काळ लाळ खुरकूत लसीकरण करून घ्यावेत, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

Spread the love  बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *