Tuesday , April 7 2026
Breaking News

LOCAL NEWS

सिलेंडर स्फोटात जखमी झालेल्यांपैकी दोघांचा मृत्यू

  बेळगाव : बेळगाव बसवन गल्ली येथे रविवारी सायंकाळी झालेल्या सिलेंडर स्फोटात जखमी झालेल्यांपैकी दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. उडुपी येथील कामाक्षी भट्ट आणि हेमंत भट्ट अशी दुर्दैवी मृतांची नावे आहेत. अन्य दोघांची प्रकृती गंभीर असून ते मृत्यूशी झुंज देत आहेत. बसवन गल्ली येथे रविवारी सायंकाळी एका घरात …

Read More »

महाराष्ट्राचे मंत्री दीपक केसरकर यांना महाराष्ट्र एकीकरण समितीचे पत्र

  बेळगाव : मुंबई वाशी येथे दुसरे विश्व मराठी संमेलन सुरू आहे. मराठी भाषा संवर्धनाबाबत संमेलनात काही निर्णय घेण्यात येतील आणि त्याचा उपयोग मराठी भाषिकांना होईल यात संशय नाही. संमेलनास महाराष्ट्र -कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषिकांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. सीमाभागातील मराठी जनता महाराष्ट्रात सामील होण्यासाठी गेली 67 वर्षे लढा देत …

Read More »

शालेय बस आणि ट्रॅक्टर यांच्यात भीषण अपघात; चार विद्यार्थ्यांचा मृत्यू

  बागलकोट : बागलकोट जिल्ह्यातील जमखंडी तालुक्यातील आळगुरु गावात शालेय वाहन आणि ट्रॅक्टर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात चार विद्यार्थ्यांचा मृत्यू तर 8 हून अधिक विद्यार्थी जखमी झाल्याची घटना मध्यरात्री बाराच्या सुमारास घडली. याबाबत समजलेली माहिती अशी की, आळगुरु गावातील श्री वर्धमान महावीर अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थेचे विद्यार्थी संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित …

Read More »

बेळगाव बसवाण गल्लीत सिलेंडर स्फोट; ५ जण गंभीर जखमी

  बेळगाव : सिलिंडरचा स्फोट होऊन एकाच कुटुंबातील पाच जण गंभीर जखमी झाले. बेळगाव बसवण गल्ली येथे खडेबाजार पोलीस स्थानकाच्या हद्दीत आज सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. ललिता भट्ट (वय ४८), मोहन भट्ट (वय ५६), कमलाक्षी भट्ट (वय ८०) , हेमंत भट्ट (वय २७), गोपीकृष्ण भट्ट (वय ८४) अशी स्फोटात …

Read More »

सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारला एक धक्का द्यावा लागेल : ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे

  बेळगाव : बेळगाव सीमाप्रश्न सीमावासियांनी खूप काही सोसला आहे. खूप काही भोगला आहे. या प्रश्नाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी महाराष्ट्र सरकारला एक धक्का द्यावाच लागेल असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि तिसऱ्या प्रगतिशील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मधुकर भावे यांनी आज बोलताना केले. येथील तुकाराम महाराज सांस्कृतिक भवनात प्रगतिशील लेखक संघाच्या तिसऱ्या साहित्य …

Read More »

सीमाभागातील संस्थांना अनुदान देण्यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध

  साठे प्रबोधिनी कढून सातत्याने पाठपुरावा बेळगाव : सीमाभागातील साहित्यिक व शैक्षणिक संस्थांना महाराष्ट्र शासन बृहन्महाराष्ट्र अनुदान योजनेमार्फत महाराष्ट्र शासन मराठी विभाग व राज्य मराठी विकास संस्था यांच्याकडून आर्थिक अनुदान देण्याची तरतूद लवकरच करण्यात येईल असे आश्वासन विश्व मराठी साहित्य संमेलनामध्ये माननीय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. दिनांक 27 …

Read More »

शिवाजी काॅलनी फुटबॉल क्लब टिळकवाडी आयोजित शालेय फुटबॉल स्पर्धेचा उद्या अंतिम दिवस

    बेळगाव : येथील श्री छत्रपती शिवाजी काॅलनी टिळकवाडी फुटबॉल क्लबतर्फे शालेय फुटबॉल स्पर्धेचा उद्या अंतिम दिवस, फायनल सामने खेळले जाणार आहेत सलग तीन दिवस हे सामने लेले मैदानावर सुरू आहेत. शहरातील निमंत्रित सोळा संघांनी सहभाग घेतला आहे. उद्या मुलींचा अंतिम सामना सेंट झेवियर वि.सेंट जोसेफ दुपारी खेळवला जाणार …

Read More »

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून प्रभारी आणि समन्वयकांची नियुक्ती

  बेंगळुरू : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने राज्याच्या प्रभारी आणि समन्वयकांची नियुक्ती केली आहे. कर्नाटक राज्याचे प्रभारी डॉ. राधामोहन दास अग्रवाल यांची तर सुधाकर रेड्डी यांची राज्य सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील २८ मतदारसंघांच्या प्रभारी आणि समन्वयकांची यादी पुढीलप्रमाणे : १) म्हैसूर – डॉ. अश्वथ नारायण – प्रभारी, …

Read More »

संस्कृती मंडळातर्फे ध्वजारोहण आणि लेझीम प्रदर्शन संपन्न

  बेळगाव (प्रतिनिधी) : प्रजासत्ताकदिन आणि शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या 350 व्या वर्षानिमित्ताने राजहंस गडावर विशेष सोहळा पार पडला टिळकवाडी येथील संस्कृती महिला मंडळाच्या वतीने हा कार्यक्रम सादर झाला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला वर्गाने सादर केलेल्या लेझीम प्रदर्शनाने उपस्थित यांची मने जिंकली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बिना तलाठी यांनी केले. प्रमुख पाहुण्या नीता …

Read More »

शरीरसौष्ठव क्षेत्रात पीएचडी मिळवणाऱ्या डॉ. अमित एस जडे यांचा सत्कार

  बेळगाव : बॉडीबिल्डिंग स्पर्धेच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव 2024 मध्ये आपल्या बेळगाव जिल्ह्यातील माजी राष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू डॉ. अमित एस  जडे यांचा शरीरसौष्ठव क्रीडा विषयात पीएचडी प्रबंध यशस्वीपणे मांडल्याबद्दल आणि विश्वेश्वरय्या तंत्रज्ञान विद्यापीठाकडून 2021 मध्ये डॉक्टरेट पुरस्कार मिळाल्याबद्दल आमदार श्री. अभय पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बेळगाव शरीरसौष्ठव क्षेत्रात …

Read More »