Sunday , December 14 2025
Breaking News

LOCAL NEWS

आरोग्य विभाग रात्रीही लागला कामाला; मनपा आयुक्तांचा धसका

  बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी स्वहर शहर स्वच्छतेच्या कामासंदर्भात विशेष काळजी घेतल्याचे दिसून येत आहे. आयुक्त दुडगुंटी यांनी काल सोमवारी पहाटेच कचरा उचलणाऱ्या गाडीतून शहर उपनगरात सुरू असलेल्या स्वच्छता कामाची अचानक पाहणी केली होती. त्यानंतर आज मंगळवारी ही त्यांनी सकाळी सकाळी दक्षिण विभागातील नाले तसेच स्वच्छता …

Read More »

पिरनवाडी- किणये रस्त्याची दुरवस्था!

  बेळगाव : पिरनवाडी ते किणये रस्त्यावर खड्डे पडून रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचल्यामुळे वाहनचालकांना खड्ड्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे छोटेमोठे अपघात घडत आहेत. किणये -पिरनवाडी रस्ता हा चोर्ला मार्गे गोव्याला जातो. त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच वाहनांची …

Read More »

गणेश मिरवणूक मार्गाची हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांच्याकडून पाहणी

  बेळगाव : गणेशोत्सवात मिरवणूक मार्गावर कुठलाही अडथळा येऊ नये, यासाठी हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी सकाळी विविध भागातील मंडप उभारणी जागेची व मिरवणूक मार्गवर लोंबकळत असलेल्या विद्युुत तारा, संदर्भात लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव व सुनील जाधव यांनी मंडळ पदाधिकार्‍यांच्या सूचनांचा विचार हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांना करण्यात आला. 19 सप्टेंबर ते …

Read More »

लोंबकळणाऱ्या विद्युत तारांकडे लक्ष द्या : गणेश मंडळांची मागणी

  बेळगाव : बेळगाव शहरातील दक्षिण भागातील नार्वेकर गल्ली शहापूर आणि इतर परिसरातील रस्त्यावर खाली लोंबकळणाऱ्या विद्युत तारा वर ओढून सुरक्षित कराव्यात, अशी मागणी शहापूर नार्वेकर गल्लीच्या बाल गणेश सार्वजनिक श्री गणेश उत्सव मंडळाने महापालिका आयुक्तांकडे केली आहे. बाल गणेश सार्वजनिक श्री गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष सागर पाटील यांच्या नेतृत्वाखाली …

Read More »

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने बार असोसिएशन अध्यक्ष ऍड. श्री. सुधीर चव्हाण यांचा सत्कार

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने बेळगाव जिल्हा बार असोसिएशन अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ऍड. श्री. सुधीर चव्हाण यांचा सत्कार रमाकांत कोंडुसकर यांच्या हस्ते करण्यात आला सत्कार. ऍड. चव्हाण यांनी आजवर समितीच्या प्रत्येक लढ्यात आपली कायदेशीर भूमिका चोकपणे बजावली आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न असो सामान्य जनतेचा प्रश्न असो, कौटुंबिक प्रश्न असो …

Read More »

सलग दुसऱ्या दिवशी मनपा आयुक्तांचा पाहणी दौरा

  बेळगाव : बेळगाव महापालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी काल सोमवारी पहाटे महापालिकेच्या घंटागाडीतून शहरातील विविध भागात पाहणी दौरा केला. त्यानंतर आज मंगळवारी शहर दक्षिण भागातील नाला व स्वच्छता कामांची पाहणी केली. आयुक्त दुडगुंटी यांनी काल अचानकपणे पहाटेच्या वेळी शहराचा दौरा करून स्वच्छता कामाची पाहणी केली होती. आयुक्तांच्या या आक्रमक …

Read More »

स्कूल बस उलटली; सुदैवाने जिवीतहानी टळली

  सांवगाव गावाजवळ घटना बेळगाव : शाळकरी मुलांना घेऊन जाणारी अंगडी इन्स्टिट्यूटची (क्र. केए 22 सी 7495) स्कूल बस उलटली मात्र सुदैवाने कोणतीही जिवीतहानी घडली नाही. सदर अपघातात बसमधील दोन विद्यार्थी, एक महिला जखमी तर अन्य किरकोळ जखमी झाले आहेत. मंगळवारी सकाळी 8.15 च्या सुमारास सांवगाव जवळ सावगाव बेनकनहळ्ळी रोडवर …

Read More »

उडुपी महाविद्यालयातील व्हिडीओ चित्रीकरण प्रकरणाची सीआयडी चौकशी करणार

  बंगळुरू : उडुपी येथील एका खाजगी महाविद्यालयाच्या शौचालयामधील व्हिडिओ चित्रीकरणाचे प्रकरण सीआयडीकडे सोपवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी याबाबत ट्विट केले आहे. ते म्हणाले की, हे प्रकरण संवेदनशील असल्याने पुढील तपासासाठी सीआयडीकडे सोपवण्यात आले आहे. उडुपी जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि महिला बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले …

Read More »

संभाजी भिडे वक्तव्याच्या निषेधार्थ शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

  बेळगाव : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा जोतिबा फुले, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु या राष्ट्रपुरुषांच्याविषयी अत्यंत हीन पातळीवरुन लांच्छनास्पद वक्तव्ये केली आहेत. भारताला मिळालेले स्वातंत्र्यही ते मानत नाहीत. १५ ऑगस्ट रोजी काळा दिवस पाळण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. त्यांचे हे वक्तव्य राज्यघटनेचा अवमान करणारे आणि देशविरोधी …

Read More »

गणेशोत्सव मंडळांना एक खिडकी योजनेतून परवानगी द्यावी : मंत्री सतीश जारकीहोळी यांची सूचना

  बेळगाव : बेळगाव शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी सर्व तयारी करावी, तसेच उत्सव मंडळांना विनाविलंब एक खिडकी योजनेतून परवानगी देण्यात यावी, अशा सूचना जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. गणेशोत्सवानिमित्त महापालिकेच्या सभागृहात आज सोमवारी (७ ऑगस्ट) झालेल्या प्राथमिक सभेच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते. यावेळी पुढे …

Read More »