बेळगाव : राज्य शासनाच्या गृहज्योति योजनेतून 200 युनिट पर्यंत वीज मोफत दिले जाणार असली तरी प्रत्येक कुटुंबाची गेल्या वर्षभरातील वीज वापराची सरासरी काढली जाणार आहे. त्या सरासरीपेक्षा दहा टक्के अतिरिक्त युनिट वीज मोफत दिली जाणार आहे. त्यामुळे सर्वच कुटुंबं सरसकट 200 युनिट वीज मोफत मिळणार नसल्याचे नक्की झाले आहे. …
Read More »LOCAL NEWS
मनपा आयुक्तपदी अशोक धुडगुंटी यांची नियुक्ती
बेळगाव : बेळगाव महापालिका आयुक्त पदी केएएस अधिकारी अशोक धुडगुंटी यांची नियुक्ती करण्याचा आदेश राज्य सरकारने बजावला असून मनपा आयुक्त रुद्रेश घाळी यांची बदली अन्यत्र करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या अधीन कार्यदर्शिनी शुक्रवारी हा नियुक्तीचा आदेश बजावला आहे. अशोक धुडगुंटी यांनी या अगोदर निवासी जिल्हाधिकारी म्हणून बेळगावात सेवा बजावली …
Read More »भूतरामट्टी येथील राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयात येणार नवा पाहुणा
बेळगाव : भूतरामट्टी येथील राणी चन्नम्मा प्राणीसंग्रहालयातील वाघांची संख्या लवकरच चारवर पोहोचणार आहे. सध्या संग्रहालयात 3 वाघ असून आणखी एक वाघीण राष्ट्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाकडून येथील संग्रहालयासाठी मंजूर झाली आहेत. या तिन्ही वाघांच्या सोबतीला पुढील आठवडाभरात बन्नेरघट्टा प्राणी संग्रहालयातून वाघीण भूतरामट्टीत दाखल होणार आहे. संग्रहालयाला भेट देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस …
Read More »येळ्ळूर सीआरसी केंद्रात निवृत्त मुख्याध्यापिका शकुंतला कुंभार यांचा सत्कार
खानापूर (प्रतिनिधी) : सुळगे (येळ्ळूर) येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शकुंतला आय. कुंभार या निवृत्त झाल्या निमित्त त्याचा येळ्ळूर सीआरसी केंद्राच्या वतीने सत्कार सोहळा नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सीआरपी केंद्र प्रमुख महेश जळगेकर होते. यावेळी मुख्याध्यापक मोहन पाटील, नोकर संघाचे जिल्हा कार्यदर्शि चंद्रशेखर कोलकार, शिक्षक संघाचे …
Read More »पतीचा खून करून पत्नीने रचला बनाव; मृतदेह चोर्ला घाटात
बेळगाव : अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या पतीचा प्रियकरासह त्याच्या मित्रांच्या सहाय्याने खून केल्याची घटना बेळगावात घडली असून, आता 4 आरोपींना एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे. मृतक रमेश कांबळे (वय 38, रा. आंबेडकरनगर) हे व्यवसायाने पेंटर असून 28 मार्च रोजी बेळगाव येथून अचानक बेपत्ता झाले होते. त्यांच्या पत्नीने (संध्या) एपीएमसी …
Read More »धक्कादायक; युवकाची आत्महत्या
बेळगाव : बेळगावातील प्रतिष्ठीत व्यक्तीच्या मुलाने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री गणेशपुर येथे घडली. आर्किटेक्चर प्रतीक प्रकाश शिरोळकर (वय 29, मूळचा रा. कोनवाळ गल्ली, सध्या रा. गणेशपूर) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. महिन्यापूर्वीच त्याचा विवाह संपन्न झाला होता. घरातील सर्व मंडळी खोलीत असताना युवकाने अचानक दुसर्या खोलीत गळफास …
Read More »कर्नाटकात दुष्काळ, पूरव्यवस्थापनासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना
बंगळूर : राज्यात दुष्काळ आणि पूर व्यवस्थापनासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्यात यावी, असा आदेश राज्य सरकारने दिला होता. त्याप्रमाणे महसूलमंत्री कृष्णभैरेगौडा यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय उपसमितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीत पाटबंधारे खात्याचे मंत्री सतीश जारकीहोळी, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री प्रियांक खर्गे, कृषिमंत्री चलुवरायस्वामी, खाण व फलोत्पादन मंत्री …
Read More »पतीनं पत्नीच्या डोक्यात दगड घालून केला खून; भांडणातून उचललं टोकाचं पाऊल
रायबाग : हारूगेरी इथं बुधवारी सकाळी साडेनऊचा सुमारास पतीने पत्नीचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना उघडकीस आली. रुक्मव्वा मलाप्पा उप्पार (वय ३०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. किरकोळ वादातून हा थरार घडला आहे. याबाबत हारूगेरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हारूगेरी येथील ईदगाहजवळ उप्पार परिवारासह राहत होता. मल्लाप्पा …
Read More »अनैतिक संबंधाची माहिती समजताच आईनं पोटच्या पोराचा केला खून
रायबाग पोलिसांची कारवाई रायबाग : आईनेच मुलाचा खून करून नैसर्गिक मृत्यू भासवल्याचे प्रकरण पोलिसांनी उघडकीस आणले. रायबाग पोलिसांनी ही कारवाई केली. अनैतिक संबंधाची माहिती मुलाला समजल्याने त्या महिलेने नातेवाइकांच्या मदतीने मुलाचा खून केला होता. महिन्याभरानंतर हा प्रकार उघडकीस आला. हरिप्रसाद संतोष भोसले (रा. रायबाग) असे खून झालेल्या मुलाचे नाव …
Read More »भरमसाठ वीज दरवाढीच्या निषेधार्थ बेळगावात उद्योजकांचा मोर्चा
बेळगाव : भरमसाठ वीज दरवाढ केल्याच्या निषेधार्थ बेळगावात आज उद्योजक आणि व्यापाऱ्यांनी सरकारच्या विरोधात मोर्चा काढला होता. हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून उद्योजकांनी वीज दरवाढीचा निषेध करत ती मागे घेण्याची मागणी केली. हेस्कॉमने उद्योगांना मनमानी करत 30% ते 70% या प्रमाणात भरमसाठ वीज दरवाढ लागू केली आहे. परिणामी आधीच संकटात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta