Sunday , July 26 2026
Breaking News

येळ्ळूर सीआरसी केंद्रात निवृत्त मुख्याध्यापिका शकुंतला कुंभार यांचा सत्कार

Spread the love

 

खानापूर (प्रतिनिधी) : सुळगे (येळ्ळूर) येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शकुंतला आय. कुंभार या निवृत्त झाल्या निमित्त त्याचा येळ्ळूर सीआरसी केंद्राच्या वतीने सत्कार सोहळा नुकताच पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सीआरपी केंद्र प्रमुख महेश जळगेकर होते. यावेळी मुख्याध्यापक मोहन पाटील, नोकर संघाचे जिल्हा कार्यदर्शि चंद्रशेखर कोलकार, शिक्षक संघाचे सदस्य अशोक सुतार, श्री. केंगेरी, सतीश पाटील, सातेरी पाखरे, मुख्याध्यापिका श्रीमती शोभा निलजकर, श्रीमती अळणावर, जयश्री पाटील, श्रीमती मोटर श्रीमती मनीयार, श्रीमती बी. बी. पाटील, श्रीमती एस पी पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत श्रीमती ऐश्वर्या टिचर यानी केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व फोटो पुजन करण्यात आले. यावेळी सत्कार मुर्ती मुख्याध्यापिका श्रीमती शकुंतला आय. कुंभार यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
सत्कार प्रसंगी उपस्थित मान्यवरांची भाषणे झाली. तर सत्कारमूर्ती मुख्याध्यापिका शकुंतला आय कुंभार यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम. एन. तमुचे यांनी केले. तर आभार श्रीमती कडबी यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

Spread the love  बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *