Tuesday , December 16 2025
Breaking News

LOCAL NEWS

सुवर्ण सौध येथे उद्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन

  बेळगाव : भारत सरकार आणि कर्नाटक सरकार यांच्या मार्गदर्शक सूचीनुसार आयुष्य खाते, जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत आणि अन्य विविध खात्यांतर्फे उद्या बुधवार दि. 21 जून रोजी सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत 9 व्या आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हा आयुष्य खात्याचे अधिकारी डॉ. श्रीकांत सुळधोळी …

Read More »

बनावट कागदपत्राद्वारे बेनकनहळ्ळीतील भूखंड विक्री

  चौघांविरोधात गुन्हा दाखल बेळगाव : बनावट कागदपत्र तयार करून बेनकनहळ्ळी ग्रामपंचायत अखत्यारितील सरस्वतीनगरमधील भूखंड विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या प्रकरणी बनावट दस्ताऐवज तयार करून फसवणूक ल्याप्रकरणी उत्तर उपनोंदणी अधिकारी रवींद्रनाथ उडिवेप्पा हंचीनाळ यांनी मार्केट पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रणय रत्नाकर शेट्टी (रा. पाईपलाईन …

Read More »

जगदीश शेट्टर यांच्यासह तिघांना उमेदवारी

  बंगळुरू : विधानपरिषदेच्या तीन जागांसाठी ३० जून रोजी पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसने माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांच्यासह तिघांना उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसचे मुख्य सचिव मुकुल वासनिक यांनी सोमवारी यासंबंधीचे पत्रक प्रसिद्ध केले आहे. पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचे तिन्ही उमेदवार मंगळवारी अर्ज दाखल करतील. माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी …

Read More »

“गृहज्योती”चा लाभ घेण्यासाठी बेळगाव वनमध्ये तोबा गर्दी

  बेळगाव : कर्नाटकातील काँग्रेस सरकारने जाहीर केलेल्या पाच गॅरंटी योजनांपैकी शक्ती योजने मागोमाग काल रविवारपासून सुरू झालेल्या ‘गृहज्योती’ या दुसऱ्या योजनेच्या नांव नोंदणीसाठी सध्या बेळगाव वन केंद्रामध्ये नागरिकांची तोबा गर्दी झालेली पहावयास मिळत आहे. घरगुती वीज जोडणी असणाऱ्या ग्राहकांना 200 युनिटपर्यंत मोफत वीज देणाऱ्या गृहज्योति योजनेच्या नांव नोंदणीला शहरात …

Read More »

बसवण कुडची पायी दिंडी पंढरपूरला रवाना

  बेळगाव : हातात पताका डोक्यावर तुळशी कट्टा आणि टाळ मृदंगाचा गजर करत बसवण कुडची येथून वारकरी भक्तांची पायी दिंडी नुकतीच पंढरपूरच्या दिशेने नुकतीच रवाना झाली. बसवन कुडची येथे गेल्या शनिवारी सकाळी विठ्ठल रखुमाई मंदिरपासून दिंडीला प्रारंभ झाला. प्रारंभी नगरसेवक बसवराज मोदगेकर, समाजसेवक परशराम बेडका आणि डॉ. सतीश चौलीगेर यांनी …

Read More »

शिवसेनेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

  बेळगाव : मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी स्थापन झालेल्या शिवसेनेचा 57 वा वर्धापन दिन गणेशपुर रोड येथील बेळगावच्या शिवसेना (सीमाभाग) कार्यालयात आज सोमवारी सकाळी उत्साहात साजरा करण्यात आला. सदर वर्धापन दिन कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वागत आणि प्रास्ताविक झाल्यानंतर शिवसेना उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर यांच्या हस्ते शिवसेनेचे संस्थापक हिंदुहृदय सम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे …

Read More »

गरज असेल तिथे टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करा : जिल्हाधिकारी नितेश पाटील

  बेळगाव : पावसाळ्याचे आगमन लांबल्यामुळे बेळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. यासाठी आता सर्व तहसीलदार आणि स्थानिक आमदारांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची बैठक बोलावून हाती घ्यावयाच्या उपाययोजना आणि आवश्यक अनुदानासंदर्भात प्रस्ताव सरकारला पाठवावा लागेल, अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली. जिल्ह्यातील लोक आणि जनावरांना …

Read More »

बेळवट्टी ग्रामपंचायत अध्यक्षपदी विठ्ठल पाटील यांची बिनविरोध निवड

  बेळगाव : बेळवट्टी ग्रामपंचायत अध्यक्षपदी ग्राम विकास आघाडीचे विठ्ठल पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यानिमित्त महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते माजी महापौर शिवाजी सुंठकर यांनी विठ्ठल पाटील यांचा पुष्पहार अर्पण करून सत्कार केला. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी एपीएमसी अध्यक्ष अप्पा जाधव, पुंडलिक पावशे, नानू पाटील, नारायण सांगावकर, किसन …

Read More »

8 जुलैला बेळगावात राष्ट्रीय लोकअदालत

  बेळगाव : कर्नाटक राज्य कायदा सेवा प्राधिकरण बेंगलोरतर्फे येत्या 8 जुलै रोजी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या अदालतीमध्ये बेळगाव जिल्ह्यातील 1 लाख 18 हजार 73 प्रलंबित खटल्यांपैकी 19000 खटले निकाली लावण्यासाठी घेण्यात येणार असले तरी किमान 14000 खटले निकाली लागण्याची शक्यता आहे. तरी पक्षकारांनी …

Read More »

मराठा समाजातील दहावी-बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना आवाहन

  बेळगाव : मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे बेळगाव जिल्ह्यातील मराठा समाजातील यंदाच्या दहावी परीक्षेत 90 टक्के बारावी परीक्षेत 85 टक्के गुण घेतलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. जे विद्यार्थी पात्र आहेत त्यानी गुणपत्रिकेची झेरॉक्स प्रत, एक आयडेटिटी कार्डं फोटो, पूर्ण पता व व्हाट्स अप नंबरसह मराठा समाज सुधारणा मंडळाच्या …

Read More »