Sunday , December 14 2025
Breaking News

LOCAL NEWS

जातनिहाय जनगणनेबाबत जनजागृती; सकल मराठा समाजातर्फे आज मेळावा

  बेळगाव : कर्नाटक सरकारच्या शैक्षणिक आणि सामाजिक सर्वेक्षण पत्रकात मराठा समाजातील लोकांनी धर्म, जात, पोटजात आणि मातृभाषा कशाप्रकारे नमूद करावी यासंदर्भात सकल मराठा समाज आणि मराठा समाजातील नेते मंडळींकडून जनजागृती करण्यात येत आहे. या अनुषंगाने मराठा समाजाचे युवा नेते किरण जाधव यांनी आज कपिलेश्वर कॉलनी, शास्त्रीनगर, गुडशेड रोड यासह …

Read More »

तुमची मेहनत आणि मनाची निष्ठा हेच खरे गुरु आहेत : रणजीत चौगुले

  बेळगाव : तुमची मेहनत आणि मनाची निष्ठा हेच खरे गुरु आहेत; धाडस करा, दिवसात छोटी छोटी उद्दिष्टे ठेवा आणि सातत्याने प्रयत्न करत रहा, यश तुमच्या पावलावर येईल, असे प्रतिपादन सरदार्स हायस्कूलचे शिक्षक रणजीत चौगुले यांनी केले. दि. बेळगाव तालुका रुरल इंडस्ट्रियल को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, बेळगाव यांच्या वतीने सभासदांच्या …

Read More »

दोन मुलांची हत्या करून आईची आत्महत्या; तुमकुर येथील घटना

  तुमकुर : हुंड्यासाठी छळ होत असल्याने या जाचाला कंटाळून दोन मुलांची हत्या करणाऱ्या आईनेही गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही दुःखद घटना तुमकुर जिल्ह्यातील पावगड तालुक्यातील कडपनकेरे येथे घडली. २३ वर्षीय सरिता नामक महिलेनेही आत्महत्या करण्यापूर्वी ४ वर्षाचा मुलगा कौशिक आणि २ वर्षाची मुलगी युक्ती यांची हत्या केली. नंतर …

Read More »

उद्यापासून जातीय जनगणना: राज्य सरकारचा अधिकृत आदेश

  बंगळूर : अनेक गोंधळ आणि विरोधाभासांमध्ये, राज्यात जात सर्वेक्षण सोमवार (ता. २२) पासून दसरा उत्सवादरम्यान सुरू होईल. राज्य सरकारने एक अधिकृत आदेश जारी केला आहे. १६ दिवस चालणाऱ्या या सर्वेक्षणासाठी जनतेला सहकार्याचे आवाहन केले आहे. हा भव्य कार्यक्रम २२ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर या कालावधीत राज्यभर आयोजित केला जाईल. …

Read More »

जात जनगणनेत ख्रिश्चन धर्मातील उपजातींचा उल्लेख आला वगळण्यात : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे स्पष्टीकरण

  बंगळुर : राज्य सरकारची बहुप्रतिक्षित जातीय जनगणना सोमवारपासून सुरू होणार असल्याचे सांगून, ख्रिश्चन धर्माअंतर्गत विविध उपजातींचा संदर्भ दर्शविणारा स्तंभ काढून टाकण्यात आला असल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शनिवारी स्पष्ट केले आहे. ख्रिश्चन धर्माला हिंदू उपजात दर्शविण्याबाबत तीव्र संताप निर्माण झाला होता. आज गदग येथे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपवर …

Read More »

इंग्रजी, कॉन्व्हेंट शाळांना हिंदू सणांची सुट्टी सक्तीची करावी : श्रीराम सेना

  बेळगाव : सरकारच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून राष्ट्रीय सणांचा तिरस्कार करणाऱ्या शहरातील इंग्रजी आणि कॉन्व्हेंट शाळांवर कारवाई करावी. तसेच दसरा सणासह हिंदूंच्या अन्य सणांची सुट्टी या शाळांसाठी सक्तीची करावी, अशी मागणी बेळगावच्या श्रीराम सेनेने बेळगाव जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे. श्रीराम सेनेचे उत्तर कर्नाटक राज्याध्यक्ष रवीदादा कोकीतकर यांच्या …

Read More »

जय किसान भाजी मार्केटची इमारत पाडण्याची मागणी!

  बेळगाव : जय किसान खासगी भाजी मार्केटची परवानगी रद्द झाल्यानंतरही इमारत न पाडल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकरी संघटनांनी आज बेळगाव महानगरपालिकेसमोर आंदोलन केले. जोपर्यंत ही इमारत तोडली जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला आहे. जय किसान खासगी भाजी मार्केटची इमारत बांधण्याची परवानगी रद्द झाली आहे, तरीही …

Read More »

पत्नीचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी पतीला शिक्षा

  बेळगाव : पत्नीचा दारू पिऊन मानसिक व शारीरिक छळ करून नाक कापल्याप्रकरणी आरोपी पती सुरेश परशुराम नाईक (वय 38 रा. शेंडसगळ, महाराष्ट्र) याला बेळगाव न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. आरोपी सुरेश हा त्याची पत्नी सुनीता (वय 35 रा. कागवाड, कर्नाटक) हिचा रोज दारू पिऊन शारीरिक व मानसिक छळ करीत होता. …

Read More »

दुचाकी चोरट्यांना हिरेबागेवाडी पोलिसांकडून अटक

  बेळगाव : बेळगाव शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेल्या दोन दुचाकी जप्त करत दोघा दुचाकी चोरांना  हिरेबागेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. एकूण 4 लाख 10 हजार रुपये किमतीच्या सात दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. बेळगाव शहरात वाढते चोरीचे प्रकार लक्षात घेत बी. एम. गंगाधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याचे …

Read More »

सर्वापित्री अमावास्ये निमित्त उद्या रविवारी श्री शनी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम

  बेळगाव : सर्वापित्री अमावास्ये निमित्त उद्या रविवारी दि. 21 रोजी पाटील गल्ली येथील श्री शनी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी नऊ वाजता आणि दुपारी बारा वाजता तैलभिषेक करण्यात येणार आहेत. शनी कथा वाचन, शनी शांती आणि तीळ होम यांचेही आयोजन करण्यात आले आहे. दुपारी अभिषेक …

Read More »