Sunday , December 14 2025
Breaking News

LOCAL NEWS

चिक्कोडी जिल्ह्याची निर्मिती 31 डिसेंबर पूर्वी : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्याचे येत्या 31 डिसेंबरपूर्वी विभाजन करून स्वतंत्र अशा चिक्कोडी जिल्ह्याची निर्मिती केली जाईल, अशी माहिती महिला व बाल कल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली. बेळगाव येथे पोषण अभियान कार्यक्रमात त्या बोलत होत्या. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या की मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने महिला आणि …

Read More »

नियती को-ऑप. सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न

  बेळगाव : नियती को-ऑप. सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा दि. १७ सप्टेंबर २०२५ रोजी न्यू उदय भवन, खानापूर रोड येथे मोठ्या उत्साहात पार पडली. सभेची सुरुवात सर्व संचालक आणि मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने झाली. श्री. भूषण रेवणकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. सोसायटीच्या संस्थापिका, अध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत यांनी सोसायटीच्या प्रगती, …

Read More »

महिलेशी अनैतिक संबंध असलेल्या तरुणाची निर्घृण हत्या; हुक्केरी तालुक्यातील घटना

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील शहाबंदर गावात विवाहित महिलेशी अनैतिक संबंध असलेल्या तरुणाची चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. कामावर गेलेल्या महांतेश बुकनट्टी (२४) याची बसमधून उतरून घरी जात असताना हल्लेखोरांनी रस्त्याच्या मधोमध तरुणाची निर्घृण हत्या केली. त्याची हत्या केल्यानंतर चाकू घटनास्थळी सोडून पळून गेले. पोलिसांनी घटनास्थळी भेट …

Read More »

सशस्त्र दरोड्यातील काही रक्कम व सोने कर्नाटक पोलिसांच्या हाती

  सोलापूर : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चडचण (जि. विजापूर) येथील शाखेत मंगळवारी सायंकाळी पडलेल्या सशस्त्र दरोड्यातील काही रक्कम व सोने कर्नाटक पोलिसांच्या हाती लागले आहे. दरोडेखोरांच्या मोटारीतून जप्त केलेली रक्कम व सोन्याची किंमत किती, हे स्पष्ट झाले नाही. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात खळबळ उडाली आहे. लष्करी गणवेशातील दरोडेखोरांनी अवघ्या वीस मिनिटांत …

Read More »

डीसीसी बॅंक निवडणूक : कत्ती समर्थकांच्या हातात धारदार शस्रे!

  बेळगाव : डीसीसी बँकेच्या निवडणुक म्हणजे जणू युद्धाचे रणांगण झाले असल्याचे चित्र हुक्केरी तालुक्यात पहायला मिळत आहे. रमेश कत्ती यांचे समर्थक चक्क हातात शस्त्रे घेऊन फिरत आहेत. हुक्केरीमध्ये डीसीसी बँकेच्या निवडणुकीचा व्याप दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, रमेश कट्टीचे समर्थक धारदार शस्त्रे घेऊन मतदारांना धमकी देत फिरत असल्याचे व्हिडीओमधून दिसत …

Read More »

दावणगिरीत श्रीराम सेनेचा प्रांत अभ्यास वर्ग संपन्न; रवी कोकीतकर यांची उत्तर कर्नाटक राज्य अध्यक्षपदी निवड

  दावणगिरी : श्रीराम सेनेतर्फे प्रांत अभ्यास वर्गाचे रविवार. दि. 14 सप्टेंबर रोजी दावणगिरी येथे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सर्व प्रांतांमधून हजारो कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती होती. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोदजी मुतालिक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात संघटनेची माहिती, कार्यपद्धती व भविष्यातील रुपरेषा ठरविण्यात आली. यावेळी …

Read More »

श्री कलमेश्वर सोसायटीची ३१ वी वार्षिक सभा उत्साहात; गुणवंत विद्यार्थी व खेळाडूंचा सत्कार

  बेळगाव : कंग्राळी बी.के. येथील श्री कलमेश्वर को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.ची ३१ वी वार्षिक सभा दिनांक १४ सप्टेंबर २०२५ रोजी सोसायटीच्या कार्यालयात पार पडली. सभेचा प्रारंभ दीपप्रज्वलन आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आला. या प्रसंगी सोसायटीचे संस्थापक व विद्यमान चेअरमन श्री. तानाजी मिनू …

Read More »

अशोकनगरमधील ऑलिंपिक दर्जाच्या जलतरण तलावाचे उद्घाटन…

  बेळगाव : बेळगावच्या अशोकनगरमध्ये तयार करण्यात आलेल्या महानगरपालिका संचालित ऑलिंपिक दर्जाच्या जलतरण तलावाचे आज अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर लोकार्पण करण्यात आले. बेळगावच्या अशोकनगरमध्ये फिरोज सेठ आमदार असताना ऑलिंपिक दर्जाचा हा जलतरण तलाव उभारण्यात आला होता. आज उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ, नगरसेवक रियाझ किल्लेदार, महानगरपालिका आयुक्त शुभा बी. आणि इतर …

Read More »

बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांची गर्दी

  बेळगाव : काही त्रुटींमुळे बेळगावच्या खासगी ‘जय किसान भाजी मार्केट’ची परवानगी कृषी संचालकांनी रद्द केल्याने, आजपासून ‘जय किसान भाजी मार्केट’ने आपला व्यवसाय थांबवला. त्यामुळे पहाटेपासूनच मोठ्या संख्येने शेतकरी आपली उत्पादने बेळगावच्या सरकारी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घेऊन आले. शेतकरी नेते चुनप्पा पुजारी यांनी सरकारी एपीएमसीमध्ये भाजीपाला उत्पादने घेऊन आलेल्या …

Read More »

“जय किसान” भाजी मार्केटची परवानगी रद्द केल्याच्या निषेधार्थ विविध शेतकरी संघटना, शेतकरी, व्यापारी आणि कामगारांचे आंदोलन…

  बेळगाव : राज्य सरकारने जय किसान खासगी भाजी मार्केटची परवानगी रद्द केल्याच्या निषेधार्थ विविध शेतकरी संघटना, शेतकरी, व्यापारी आणि कामगारांनी सरकारविरोधात तीव्र रोष व्यक्त करत आंदोलन केले. बेळगावातील खासगी जय किसान मार्केटमधील 300 दुकानांचे व्यापारी आणि कामगार ए.पी.एम.सी. परवानगी रद्द झाल्याने अडचणीत सापडले आहेत. दहा वर्षांसाठी ‘ट्रेडिंग लायसन्स’ (व्यापार …

Read More »