बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे रविवारी (ता. २९) रोजी मराठा मंदिर येथे हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. महिलांमध्ये वेगवेगळ्या विषयांवर जनजागृती करण्यासाठी हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून ऍड. श्रुती सडेकर व शीतल बडमंजी यावेळी …
Read More »LOCAL NEWS
रिंगरोडसंदर्भात म. ए. समिती शिष्टमंडळाने घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट
कोल्हापूर : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समीतीच्या शिष्टमंडळाने आज शनिवारी सकाळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. सीमा भागातील शेतकऱ्यांच्या सुपिक जमिनी संपादित केला जात आहेत. याचबरोबर अन्य महत्त्वपूर्ण विषयांवर मध्यवर्तीच्या पदाधिकाऱ्यांनी नितीन गडकरी यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याचे …
Read More »विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण मार्गदर्शनाची गरज : परमेश्वर हेगडे
बेळगाव : नववी आणि दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाचे वेळीच मार्गदर्शन लाभले तर विद्यार्थ्यांना अनुकूल होईल, असे मत विद्या भारती संस्थेचे अध्यक्ष परमेश्वर हेगडे यांनी व्यक्त केले. बेळगावचे के. के. वेणुगोपाल हॉल येथे जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्या जितोच्यावतीने नववी आणि दहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक शिक्षण या विषयावरील मार्गदर्शनाच्या दहाव्या …
Read More »तानाजी गल्ली महिला मंडळच्यावतीने हळदीकुंकू समारंभ साजरा
बेळगाव : तानाजी गल्ली महिला मंडळ हळदी कुंकू समारंभ दि.२६/०१/२३ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त तानाजी गल्ली महिला मंडळाच्या वतीने हळदी कुंकू समारंभ साजरा करण्यात आला. यावेळी श्रीमती शीतल कंग्राळकर ग्रुपने ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एंजल फाउंडेशच्या सौ. मीना बेनके व वॉर्ड क्र.९ च्या नगरसेविका सौ. …
Read More »बनावट मार्क्सकार्ड रॅकेटचा पर्दाफाश; बंगळुरमध्ये पाच संस्थांवर छापेमारी
बंगळूर : केंद्रीय गुन्हे शाखेने (सीसीबी) बनावट मार्क्स कार्ड रॅकेट चालवणाऱ्या पाच संस्थांवर छापे टाकले आणि भारतातील नामांकित विद्यापीठांच्या सहा हजार बनावट गुणपत्रिका जप्त केल्या. गेल्या काही दिवसांत सीसीबीकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. मार्क्स कार्ड रॅकेटच्या पोलिस तपासात बंगळुरच्या विविध भागांतील पाच संस्था या रॅकेटमध्ये सामील असल्याचे समजते. पोलिसांनी …
Read More »प्रगतिशील लेखक संघाचे दुसरे मराठी साहित्य संमेलन आजपासून
बेळगाव : येथील प्रगतिशील लेखक संघाच्या वतीने दुसरे मराठी साहित्य संमेलन आयोजित केले आहे. आज शनिवार दि. २८ व रविवार दि. २९ जानेवारी २०२३ असे दोन दिवस महात्मा ज्योतिराव फुले साहित्यनगरी मराठी विद्यानिकेतन, बेळगांव येथे हे संमेलन होणार आहे. थोर क्रांतिकारक महात्मा ज्योतिराव फुले यांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी …
Read More »प्रभू रामचंद्रांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांवर कडक कारवाई करा
बेळगाव : वादग्रस्त के. एस. भगवान आणि बिहारचे शिक्षणमंत्री चंद्रशेखर यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करून श्रीराम आणि श्री राम चरित मानस यांचा अवमान करणाऱ्यांना तात्काळ अटक करा अशी मागणी हिंदू जनजागृती समिती आणि सर्व हिंदू संघटनांनी केली. कर्नाटकातील लेखक के एस भगवान यांनी प्रभू श्री रामचंद्रांविषयी अश्लाघ्य वक्तव्य केले …
Read More »जीवनात यशस्वी होण्यासाठी वाचन महत्त्वाचे : प्रा. मायाप्पा पाटील
बेळगाव : विद्यार्थ्यांनो पुस्तक वाचा, तुम्ही पुस्तके वाचालात तर वाचाल नाहीतर यशस्वी होण्यास मार्ग कठीण आहे, असे उद्गार राणी पार्वती देवी महाविद्यालयाचे प्राध्यापक मायाप्पा पाटील यांनी पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयाचा स्नेहसंमेलन प्रसंगी काढले. स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी विश्वभारत सेवा समिती बेळगावचे उपाध्यक्ष श्री. नेताजीराव कटांबळे हे होते. वडगाव येथील अन्नपूर्णेश्वरी …
Read More »ब्रिटिशांच्या विरुद्ध लढा देणाऱ्या कित्तूर राणी चन्नम्माचा आदर्श घ्यावा : प्रा. मायाप्पा पाटील
ज्योती गवी फाऊंडेशनतर्फे प्रबोधनात्मक शिबीर व तिळगूळ समारंभ संपन्न बेळगाव : स्त्री पुरुष असा कोणताच भेदभाव न करता एकमेकांनी एकमेकांना समजून घेऊन प्रत्येक क्षेत्रात कार्य करण्यासाठी स्त्रियांना प्रोत्साहन देणे अत्यंत गरजेचे काळाची गरज निर्माण झाली आहे. मतभेद आणि भेदभाव दूर करून स्त्रियांच्या प्रगतीस पोषक वातावरणाची निर्मिती करायला हवी. काकती …
Read More »धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळा परिसराचे उद्या लोकार्पण
बेळगाव : बेळगावातील प्रमुख चौक असलेल्या धर्मवीर संभाजी महाराज चौकातील धर्मवीर संभाजी महाराजांच्या नूतनीकरण व सुशोभीकरण केलेल्या पुतळा व परिसराचा लोकार्पण सोहळा उद्या, शनिवारी सायंकाळी आयोजित केल्याची माहिती आ. अनिल बेनके यांनी दिली. बेळगावात प्रसारमाध्यमांशी बोलताना आ. अनिल बेनके म्हणाले, उद्या छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन आहे. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta