Friday , September 13 2024
Breaking News

LOCAL NEWS

मृणाल हेब्बाळकर व मित्रमंडळींकडून गणेशपुर स्मशानभूमीत साफसफाई

बेळगाव : सध्या देशात व राज्यात कोरोनासारख्या रोगराईने हैदोस घातला असून सर्वसामान्य जनतेला अनेक गोष्टींचा सामना करावा लागत आहे. बेळगाव ग्रामीणच्या विद्यमान आमदार सौ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सुद्धा या कोरोना महामारीत आपल्या ग्रामीण मतदारसंघातील प्रत्येक गावांमध्ये कोविड आयसोलेशन किट देऊन जनतेच्या पाठीशी आरोग्य लक्ष्मी या रूपाने खंबीर उभे राहून जनतेची …

Read More »

अनैतिक संबंधात अडथळा ठरल्याने प्रियकराच्या मदतीने पत्नीकडून पतीचा खून

बेळगाव : यरगट्टी तालुक्यातील मुगलीहाळ गावात, पत्नीने कट रचून तिच्या पतीचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधात पतीचा अडसर निर्माण झाल्याने त्याचा खून केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. अनैतिक संबंधात पती अडथळा ठरत असल्याने त्याचा खून केल्याची घटना यरगट्टी तालुक्यातील मुगलीहाळ …

Read More »

चार दिवसांपासून घरात आजारी एकाकी असलेल्या व्यक्तीला केले जिल्हा रुग्णालयात दाखल

बेळगाव : मागील चार दिवसांपासून घरात अतिशय आजारी असलेल्या एका व्यक्तीला पोलिस आणि आरोग्य विभागाच्या सहकार्याने बेळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अनगोळकर यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले बेळगाव येथील, टिळकवाडी येथील सावरकर रोडवरील शिवाजी कॉलनीत राहणारे विश्वनाथ गायचरे (वय ५६) हे गेल्या चार दिवसांपासून आपल्या भाड्याच्या घरातून बाहेर आले नव्हते. …

Read More »

शिवराज्याभिषेक सोहळा छत्रपतीच्या उद्यानात यंदा साधेपणाने साजरा

बेळगाव : अत्यंत मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत व सोशल डिस्टस्टिंग पाळून अगदी साधेपणाने रविवारी सकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी उद्यानात शिवजयंती चित्ररथ महामंडळ बेळगाव व शिवराज्याभिषेक उत्सव मंडळ बेळगावच्यावतीने आज 348 वा शिवराज्याभिषेक ( शिवस्वराज ) दिन साजरा करण्यात आला. यंदा करोनामुळे दरवर्षीसारखा जोश नव्हता. दरवर्षी 6 जूनला छत्रपती शिवाजी उद्यानात …

Read More »

कर्नाटक: भाजप नेते नाराज आमदारांची घेणार स्वतंत्र भेट

बेंगलोर: राज्याचे पर्यटनमंत्री सी. पी. योगेश्वर यांनी राज्य सरकारविरूद्ध केलेल्या टीकेनंतर भाजप नेतृत्त्वाने अशा नाराज आमदारांना स्वतंत्रपणे संपर्क साधण्याचा आणि त्यांच्या समस्या सोडवण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी भाजप प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील, ज्येष्ठ मंत्री आणि पक्षाच्या नेत्यांसमवेत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. या विषयावर चर्चा करण्यासाठी कटील लवकरच मुख्यमंत्री बी. …

Read More »

संसर्ग दर कमी तेथे होणार अनलॉक : मुख्यमंत्र्यांचे संकेत

बेंगळुरू : कोरोना संसर्ग दर कमी आहे अशा ठिकाणी लॉकडाउन मागे घेऊन अनलॉक करण्यावर विचार करण्यात येईल. याबाबत सर्व जिल्ह्यांतील कोरोना स्थितीचा आढावा घेऊन मंत्री आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे सांगत मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी राज्यात अनलॉकचे संकेत दिले.बंगळुरात मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या कृष्ण या गृहकचेरीत शनिवारी कर्नाटक बांधकाम …

Read More »

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नेचर इलाईट फौंडेशनच्यावतीने वृक्षारोपण

बेळगाव : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नेचर इलाईट फौंडेशनच्यावतीने शहरातील स्वामी विवेकानंद कॉलनीत वृक्षारोपण करण्यात आले. ह्या कार्यक्रमात राज्य भाजप ओबीसी मोर्चा सचिव व विमल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री. किरण जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ह्या प्रसंगी शेखर हंडे, बाबूलाल राजपुरोहित, विक्रम पुरोहित, रमेश पाटील, संतोष पेडणेकर, चेतन नंदगडकर व …

Read More »

दिलासादायक: कर्नाटकात ८८ टक्क्याहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

बेंगळुरू : राज्यात पूर्ण लॉकडाऊननंतर कोरोना रुग्णांची संख्या कमी कमी होत आहे. तसेच कोरोना सकारात्मक दरही कमी होत असल्याने राज्याला दिलासा मिळत आहे. राज्य सरकारने सकारात्मकतेचे प्रमाण पाच टक्क्यांपेक्षा कमी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. शुक्रवारी राज्यात सकारात्मकता दर १०.६६ टक्क्यांवर होता. राज्यात शुक्रवारी मृतांची संख्याही कमी झाली. दरम्यान राज्यात आतापर्यंत …

Read More »

एसएसएलसी परीक्षेपूर्वी शिक्षकांना दिली जाणार लस

/प्रतिनिधी बेंगळूर : प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाने सर्व शिक्षकांना एसएसएलसी परीक्षेस सामोरे जाण्यापूर्वी लस देण्याचे ठरविले आहे, परंतु अनेक माध्यमिक शिक्षकांना वेळेत दोन्ही डोस न मिळाण्याची भीती आहे. त्यामुळे परीक्षेच्या आधी सर्व शिक्षकांचे वेळेवर लसीकरण होणे गरजेचे आहे. कोरोनाचा धोका ओळखून राज्य सरकारने १२ वी ची परीक्षा रद्द केली …

Read More »

कर्नाटकात ‘ब्लॅक फंगस’वर होणार मोफत उपचार : आरोग्यमंत्री के. सुधाकर

बेंगळूर : राज्यात ब्लॅक फंगसचे रुग्ण वाढत आहेत. दरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी, सरकारी रुग्णालयात आणि ‘आयुष्मान भारत आरोग्य कर्नाटक’ योजनेंतर्गत म्युकरमायकोसिस (‘ब्लॅक फंगस’) वर मोफत उपचार केले जाणार असल्याची माहिती दिली आहे. ब्लॅक फंगसचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर राज्यात सरकारी आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान आरोग्य विभागाने …

Read More »