Monday , April 6 2026
Breaking News

LOCAL NEWS

मोफत बस प्रवासासाठी झेरॉक्स प्रती ग्राह्य

  बेळगाव : रविवारपासून कर्नाटक काँग्रेसच्या शक्ती योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या योजनेला महिला वर्गाकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. राज्य परिवहन मंडळाच्या बसमधून प्रवास करताना ओळळखपत्राची झेरॉक्स प्रत किंवा मोबाईलमधील डिजी लॉकर मधील कोणतेही ओळखपत्र दाखवून मोफत बस प्रवास करता येणार आहे, असे स्पष्टीकरण राज्य परिवहन मंडळाने दिले आहे. राज्यात …

Read More »

ऍड. नागेश सातेरी अमृत महोत्सव सोहळा समितीची आज बैठक

  बेळगाव : ऍड. नागेश सातेरी अमृत महोत्सव सोहळा समितीची बैठक मंगळवार दि. १३ जून रोजी सायंकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आली आहे. गिरीश काँप्लेक्स, कार पार्किंग एरिया, रामदेव गल्ली, बेळगाव येथे ही बैठक होणार आहे. सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष प्रा. आनंद मेणसे यांनी केले आहे.

Read More »

बेपत्ता व्यक्तीला सामाजिक कार्यकर्त्यांची मदत

  बेळगाव : बेळगावमधील श्रीनगर गार्डन परिसरात असलेल्या उड्डाणपुलाखाली डॉ. उमेश रोहिल्ला नामक व्यक्ती बेघर असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनात आले. सदर व्यक्तीला स्मृतिभ्रंश झाला असून त्या व्यक्तीला मदत करण्याच्या हेतूने जागरूक नागरिकांनी सामाजिक कार्यकर्त्यांच्या कानावर हि बाब घातली आणि आज पोलीस आणि १०८ रुग्णवाहिकेचा माध्यमातून बेळगाव जिल्हा रुग्णालयाच्या मानसिक स्वास्थ्य …

Read More »

पतीच्या हल्ल्यातील जखमी पत्नीचे निधन

  बेळगाव : पतीने कुऱ्हाडीने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या गणेश पेठ जुने बेळगांव येथील रहिवासी प्रमोदिनी संपत सोमनाचे यांचा मृत्यू झाला आहे. मानसिक स्वास्थ्य बिघडलेल्या संपत शंकर सोमनाचे (वय ४७) याने आपल्याच पत्नीवर कुऱ्हाडीने घाव घालत गंभीर जखमी केले होते. जखमी अवस्थेत प्रमोदिनी यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात …

Read More »

विद्यार्थी -विद्यार्थिनींसाठी मार्गदर्शनपर कार्यशाळा संपन्न

  पोलीस प्रशासन, एफएफसीतर्फे कार्यशाळा संपन्न बेळगाव : कर्नाटक पोलीस प्रशासनातर्फे फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या सहकार्याने मोबाईल वापर, सायबर गुन्हेगारी, आरोग्याची काळजी आदी विषयावर शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित मार्गदर्शनपर कार्यशाळा आज सोमवारी दुपारी उस्फुर्त प्रतिसादात पार पडली. शहरातील श्रीनगर गार्डन नजीकच्या लव्ह डेल सेंट्रल स्कूलच्या सभागृहात आयोजित सदर कार्यशाळेस प्रमुख …

Read More »

विश्वभारती कला क्रीडा फाउंडेशन आयोजित “कारगिल मॅरेथॉन -2023” उत्स्फूर्त प्रतिसादात पार

  बेळगाव : विश्वभारती कला क्रीडा फाउंडेशन आयोजित “कारगिल मॅरेथॉन -2023” ही धावण्याची शर्यत काल रविवारी उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडली. सदर शर्यतीत स्नेहा भोसले, आकांक्षा गणेबैलकर, अमोल पंढरपूर, प्रतीक्षा कुंभार, राहुल सूर्यवंशी आणि कल्लाप्पा तिर्वीरकर या धावपटूंनी आपापल्या गटाचे विजेतेपद पटकावले. “कारगिल मॅरेथॉन -2023” मध्ये 42 कि.मी. फुल मॅरेथॉन, 21 …

Read More »

कर्नाटकसह ७ राज्यात माध्यमिक स्तरावर शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त

  नवी दिल्ली : कर्नाटकसह सात राज्यात माध्यमिक स्तरावर शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त आहे, अशी माहिती शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारित काम करणाऱ्या प्रोजेक्ट अप्रुवल मंडळाने दिली आहे. माध्यमिक स्तरावर शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय सरासरी 12.6 टक्के इतकी आहे. या सरासरीपेक्षा जास्त प्रमाण असलेल्या राज्यांमध्ये कर्नाटक, बिहार, गुजरात, आसाम आणि पंजाब …

Read More »

कर्नाटकात महिलांना मोफत बस प्रवास; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

  बंगळूर : बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित शक्ती योजना अर्थात महिलांसाठी मोफत बस प्रवास योजनेचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी आज (दि.११) उद्घाटन केले. बंगळूरमध्ये विधानसौंधसमोर हा कार्यक्रम पार पडला. राज्यभरात ही योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला कर्नाटकाची रहिवाशी असली पाहिजे. शिवाय प्रवास करताना …

Read More »

कर्नाटकात महिलांसाठी मोफत बस प्रवास “शक्ती” योजनेचा प्रारंभ

  महिला सक्षमीकरणासाठी “शक्ती”चा पाठिंबा’: मंत्री सतीश जारकीहोळी बेळगाव : राज्यभरातील महिलांसाठी मोफत बस प्रवास उपलब्ध करून देणाऱ्या ‘शक्ती’ योजनेचा लाभ घेऊन महिलांचे सक्षमीकरण करावे. सार्वजनिक बांधकाम व बेळगाव जिल्ह्याचे प्रभारी मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले की, शैक्षणिक प्रवास, व्यावसायिक कौशल्य विकास यासारख्या उद्देशांसाठी या योजनेचा वापर करून महिलांना सर्वप्रकारे सक्षम …

Read More »

कर्नाटकसह 5 राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता!

  बेंगळुरू : अरबी समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळाची तीव्रता वाढली आहे. याचा परिणाम म्हणून कर्नाटकसह देशातील 5 राज्यांमध्ये पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यातील काही आंतरदेशीय जिल्ह्यांसह किनारपट्टीवर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. ताशी ४५ ते ५५ किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात …

Read More »