Thursday , May 28 2026
Breaking News

भरधाव टिप्परची ट्रॅक्टरला धडक; ट्रॅक्टर चालक जागीच ठार

Spread the love

 

बेळगाव : भरधाव टिप्परची ट्रॅक्टरला धडक बसल्यामुळे ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. संतोष महावीर हुडेद (वय वर्षे 23) राहणार विजयनगर हलगा असे ठार झालेल्या ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे. बुधवार दिनांक 25 रोजी सकाळी 7 च्या सुमारास सदर अपघात राष्ट्रीय महामार्गाजवळील खमकारट्टी गावाजवळ घडला आहे.
संतोष हुडेद हा आपला ट्रॅक्टर घेऊन आपल्या शेताकडे जात होता. राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना पाठीमागून येणाऱ्या भरधाव खडीने भरलेल्या टिप्परने ट्रॅक्टरला जोराची धडक दिल्यामुळे ट्रॅक्टर चालक संतोष हा रस्त्याच्या कडेला फेकला गेला व संतोषवर टिप्पर मधील सर्व खडी कोसळली. यामुळे खडीखालीच तो गाडला गेला व जागीच ठार झाला. टिप्परची धडक इतकी जोराची होती की ट्रॅक्टरचे मोठे नुकसान झाले आहे. अपघात घडतात मोठा आवाज आला, यामुळे येथून रहदारी करणारे नागरिक घटनास्थळी दाखल झाले. हा अपघात इतका भीषण होता की घटनास्थळी दाखल होतात नागरिकांना ट्रॅक्टर चालकाचा पत्ताच लागला नाही, परंतु थोड्या उशिरानंतर संतोष हा खडीमध्ये गाडला गेला याची जाणीव होताच आजूबाजूच्या नागरिकांनी त्याला बाहेर काढले परंतु तो जागीच गतप्राण झाला होता. सकाळी हा अपघात घडल्यामुळे ही घटना हलगा गावात वाऱ्यासारखी पसरली, यामुळे हलगा येथील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. संतोष हा उमदा तरुण ठार झाल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पळवटुन टाकणारा होता. त्याच्या पश्चात आजोबा, आई-वडील, एक भाऊ, एक बहीण असा परिवार आहे. उमद्या वयातच संतोषवर काळाचा घाला पडल्यामुळे अनेक जण हळहळ व्यक्त करत होते. हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

धक्कादायक! एसडीआरएफचे सीपीआय श्रीशैल चौगुले यांची गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love  बेळगाव : राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे (एसडीआरएफ) सीपीआय श्रीशैल चौगुले (वय ३७) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *