बेळगाव (प्रतिनिधी) : टिळकवाडीतील खानापूर रोडवर भर रस्त्यात डस्टर कारने अचानक पेट घेतल्याने चांगलीच तारांबळ उडाली. रात्री नऊच्या सुमारास हा अपघात घडला. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. खानापूर रोडवरील कॉसमॉस बँकेसमोर घडलेल्या या प्रकाराने या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. त्यामुळे अन्य मार्गांवर रहदारीचा ताण वाढला होता. रहदारीच्या मार्गावरील …
Read More »LOCAL NEWS
शिवजयंती चित्ररथ मिरवणूकीची जय्यत तयारी
बेळगाव : शिवजयंती चित्ररथ मिरवणूक शनिवार दि. २७ मे रोजी काढली जाणार आहे. जिवंत देखावे, लाठी मेळा, ढोल-ताशा, ध्वजपथक, लेझीम मेळा, हत्ती-घोडे अशा शिवमय वातावरणात चित्ररथ मिरवणूक काढली जाणार आहे. यासाठी शिवभक्तांकडून तसेच युवक मंडळांकडून जय्यत तयारी केली जात आहे. अवघे बारा दिवस शिल्लक राहिल्याने साहित्याची जमवाजमव, शिवचरित्रावरील प्रसंग …
Read More »माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या दिल्लीला रवाना
बेंगळुरू : विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या अभूतपूर्व विजयाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे, तर दुसरीकडे मुख्यमंत्रिपदाच्या निवडीवरून गोंधळ उडाला आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या दिल्लीला रवाना झाले असून आमदार जमीर अहमद यांनीही सिद्धरामय्या यांच्यासोबत दिल्लीचा प्रवास केला आहे. एकीकडे केपीसीसीचे अध्यक्ष डीके शिवकुमार मुख्यमंत्रीपदासाठी जोर लावत आहेत, …
Read More »रेल्वेच्या धडकेत 15 हून अधिक म्हशींचा मृत्यू
मंगळुरू : रेल्वेच्या धडकेने 15 हून अधिक म्हशींचा मृत्यू झाल्याची घटना मंगळुरूजवळील जोकट्टे येथील अंगरगुंडी येथे घडली. वृत्त कळताच कद्री अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळ गाठून रुळावरील गुरांचे मृतदेह बाहेर काढले. एक मालगाडी कंकनाडीहून एमसीएफच्या दिशेने येत होती. रेल्वेच्या आवाजाने घाबरलेल्या म्हशी रेल्वे पुलावर धावू लागल्याने हा अपघात झाल्याची माहिती …
Read More »रस्त्यावरच्या लढाईसाठी सज्ज; मराठी भाषिकांचा निर्धार!
बेळगाव : गेल्या अनेक वर्षांत महाराष्ट्र एकीकरण समितीने अनेक चढ-उतार पाहिले आहेत. विधानसभा निवडणुकीत समितीच्या उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले असले, तरी याचा कोणताही परिणाम सीमालढ्यावर होणार नाही. आगामी काळात सीमाप्रश्नाची सोडवणूक करून घेण्यासाठी अधिक ताकदीने लढण्याचा निर्धार मराठी भाषिकांतून केला जात आहे. भाषावार प्रांतरचना झाल्यापासून सीमाप्रश्नाची सोडवणूक करुन …
Read More »राकसकोप जलाशयातील पाणी पातळीत घट
बेळगाव : शहरवासियांची तहान भागविणाऱ्या राकसकोप जलाशयामधील पाणी पातळी खालावत चालल्याने पाणीपुरवठ्यात कपात करण्यात आली आहे. मात्र आता राकसकोप जलाशयात केवळ पावणे सात फूट पाणीसाठा शिल्लक राहिला असून वीस दिवस पुरेल इतके पाणी शिल्लक आहे. पण यंदा वळीव पावसाने दडी दिल्याने पाणी समस्या गंभीर बनली आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी …
Read More »शाळेच्या पहिल्याच दिवशी मिळणार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य!
बेळगाव : बेळगाव उन्हाळी सुटीनंतर कर्नाटकातील शाळा सोमवार दि. २९ मे पासून पुन्हा सुरू होणार आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना सर्व पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याची तयारी शालेय शिक्षण विभागाने केली आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच शाळांमध्ये पाठ्यपुस्तके पोहोचली आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळणार आहेत. मागील वर्षी पाठ्यपुस्तकांतील …
Read More »फटाके फोडणे, शिवीगाळ प्रकरणी नगरसेवक नितीन जाधवसह २३ जणांविरुद्ध गुन्हा
बेळगाव : होसूर बसवान गल्ली, शहापूर येथे माजी नगरसेविका सुधा मनोहर भातकांडे यांच्या घरात फटाकडे फोडण्यासह शिवीगाळ केल्याप्रकरणी नगरसेवक नितीन जाधव यांच्यासह २३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सुधा भातकांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेऊन तपास चालविला आहे. विनायक काळेनट्टी, परशराम पेडणेकर, जयनाथ जाधव, राहुल …
Read More »महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे दिल्लीतील प्रतिनिधी म्हणून बेळगावच्या युवकाची नियुक्ती
बेळगाव : केळकर बाग बेळगाव येथील युवक अभिषेक जाधव यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे दिल्ली आणि राज्य सरकारचे समन्वयक म्हणून काम नियुक्ती करण्यात आली आहे. नुकताच त्यांची महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्र्यांचे दिल्लीतील प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली आहे. अभिषेक जाधव हे केंद्र आणि महाराष्ट्र शासनाचे समन्वयक म्हणून काम करणार आहेत. नवी दिल्ली येथील …
Read More »कर्नाटकमध्ये अडीच-अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद?
बेंगळुरु : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपाला चारी मुंड्या चीत केले आहे. येथे काँग्रेसने 135 जागांवर विजय मिळविला असून बहुमताचा आकडा पार केला आहे. कर्नाटकात एकहाती सत्ता आल्यामुळे काँग्रेसच्या गोटात आनंदीआनंद आहे. तर येथे भाजपाला अवघ्या 66 जागांवर विजय मिळवू शकला आहे. दरम्यान, ही निवडणूक काँग्रेसने जिंकल्यानंतर येथे मुख्यमंत्रीपदाची …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta