Sunday , December 14 2025
Breaking News

LOCAL NEWS

मराठी भाषिकांवर पोलिसांची दादागिरी : समिती नेते अटकेत

  महाराष्ट्रातील पत्रकारांवरही दबावतंत्र बेळगाव : कर्नाटकी विधिमंडळ अधिवेशनाला प्रत्युत्तर देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या महामेळाव्याला शेवटच्या क्षणी पोलिसांनी परवानगी नाकारून दबाव तंत्राचा वापर सुरू केला आहे. आज सकाळपासून या परिसरात 144 कलम लागू करण्यात आले असून व्हॅक्सिन डेपो येथे उभारण्यात आलेला मंडप आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले …

Read More »

ऐनवेळी महामेळाव्याची परवानगी नाकारली; १४४ कलम लागू

  बेळगावः आज बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. मात्र ऐनवेळी या मेळाव्याची परवानगी रद्द करण्यात आलेली आहे. कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील नेत्यांना कर्नाटकात येण्यास मज्जाव केलाय. महाराष्ट्र एकीकरण समितीचा बेळगाव येथे दरवर्षी मेळावा होतो. यावर्षीही हा मेळावा आज होणार होता. त्याची संपूर्ण तयारीही झाली होती. या मेळाव्याला …

Read More »

महामेळाव्यासाठी दुसऱ्या रेल्वे गेटकडूनच व्हॅक्सिन डेपोकडे प्रवेश

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आयोजित मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला जिल्हा प्रशासनाकडून सशर्त परवानगी मिळाली आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून इतर सर्व रस्ते सील बंद करून मेळाव्याच्या ठिकाणी जाण्यासाठी दुसऱ्या रेल्वे गेट येथील एकच मार्ग खुला ठेवला जाणार आहे. कायदा व सुव्यवस्था विभागाचे एडीजीपी अलोक कुमार यांनी आज सकाळी व्हॅक्सिन …

Read More »

वधू-वर पालक मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

  बेळगाव : बेळगाव मराठा समाज सुधारणा मंडळ आयोजित केलेल्या मासिक वधू वर पालक मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मेलगे गल्ली शहापूर येथे मंडळाच्या वास्तूत झालेल्या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे कार्याध्यक्ष शिवराज पाटील होते तर व्यासपीठावर वधू वर मंडळ प्रमुख ईश्वर लगाडे, सरचिटणीस जी. जी. कानडीकर, खजिनदार के. एल. मजूकर, मोहन सप्रे …

Read More »

खा. धैर्यशील माने यांना बेळगावात प्रवेशबंदी!

  बेळगाव : बेळगावात उद्या होणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला उपस्थित राहणार असलेले कोल्हापूरचे खासदार आणि महाराष्ट्र सरकारच्या सीमाप्रश्नी नेमलेल्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष धैर्यशील माने यांना बेळगावात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. बेळगावचे जिल्हा दंडाधिकारी नितेश पाटील यांनी आज रविवारी दुपारी हा आदेश बजावला. कर्नाटक विधिमंडळ अधिवेशनाला प्रत्युत्तर देण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र …

Read More »

छत्रपती शिवाजी महाराजांसाठी ‘नो कॉम्प्रमाईज’; खासदार छत्रपती युवराज संभाजीराजे

बेळगाव : आज साडेतीनशे हे वर्षानंतरही छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांच्या नसा नसात भिनले आहेत. आपल्या जीवनात शिवरायांना स्मरण केल्याशिवाय आपण पुढेच जाऊ शकत नाही. बाकीच्यांसाठी कॉम्प्रोमाइज पण छत्रपती शिवाजी महाराजांसाठी नो कॉम्प्रमाईज! कारण ते आपले दैवत आहेत, असे उद्गार कोल्हापूरचे माजी खासदार छत्रपती युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी काढले. होनगा …

Read More »

अधिवेशनात मराठा आरक्षणाचा आवाज घुमणार, आमदार अनिल बेनके यांची माहिती

  बेळगाव – गेल्या वीस वर्षापासून मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी सरकार दरबारी सातत्याने केली जात आहे.आरक्षणा विना मराठा समाजाची प्रगती खुंटली आहे. त्यामुळेच आरक्षणाच्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी, मंगळवार दिनांक 20 डिसेंबर रोजी समस्त मराठा समाजाच्या वतीने सुवर्णसौध समोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. हिवाळी अधिवेशनात राज्यातील सर्व मराठा आमदार …

Read More »

महामेळाव्याला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचा येळ्ळूर, हिंडलगा, शहापूर समितीचा निर्धार!

  बेळगाव : समितीच्या वतीने दि.19 डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या महामेळाव्याद्वारेच कर्नाटक सरकारला उत्तर देऊ आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रात जाण्याचा वज्र निर्धार येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीने केला आहे. 19 डिसेंबर रोजी कर्नाटक विधी मंडळाच्या अधिवेशन विरोधी महामेळाव्यासाठी पाठिंबा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत मोठ्या संख्येने येळ्ळूरवासीय महामेळाव्यात …

Read More »

ई सायकल बाईक शेअरिंग व्यवस्थेचे आ. अनिल बेनके यांच्याहस्ते उद्घाटन

  बेळगाव : बेळगाव उत्तर मतदार संघामध्ये बेळगावमधली पहिली पब्लिक ई सायकल बाईक शेअरिंग व्यवस्था साकारली आहे. आज शनिवारी चन्नमा सर्कल येथे या व्यवस्थेचे आ. अनिल बेनके यांनी जिल्हाधिकारी नितीश पाटील तसेच स्मार्ट सिटीचे एमडी प्रवीण बागेवाडी यांच्या उपस्थितीत उद्घाटन केले. वेळ, पैसे आणि पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या हेतूने आणि स्वास्थ्यही …

Read More »

दिव्यांगांना 24-25 डिसेंबर रोजी आवश्यक उपकरणांचे वाटप

  बेळगाव : शहरात 24 आणि 25 डिसेंबर रोजी, शाहीन कॉलेज आणि अल-अमीन मेडिकल कॉलेजच्या प्रांगणात दिव्यांगांसाठी मूल्यांकन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती शाहीन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तौसीफ मडिकेरी यांनी दिली. शहरात शनिवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, हे शिबिर केंद्र …

Read More »