बेळगावः आज बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. मात्र ऐनवेळी या मेळाव्याची परवानगी रद्द करण्यात आलेली आहे. कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील नेत्यांना कर्नाटकात येण्यास मज्जाव केलाय.
महाराष्ट्र एकीकरण समितीचा बेळगाव येथे दरवर्षी मेळावा होतो. यावर्षीही हा मेळावा आज होणार होता. त्याची संपूर्ण तयारीही झाली होती. या मेळाव्याला प्रशासनाने परवानगी दिल्याचं एकीकरण समितीने सांगितलं. मात्र या मेळाव्याची परवानगी रद्द करण्यात आली आहे.
बेळगावमध्ये १४४ कलम लागू करण्यात आलेलं आहे. पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही. या मेळाव्याला परवानगीच दिली नव्हती, असं पोलिसांचं म्हणणं आहे. मात्र महाराष्ट्र एकीकरण समितीने ही गळचेपी करण्याचं म्हटलं आहे.