बेळगाव : बेळगावमधील महत्वपूर्ण धर्मवीर संभाजी चौकातील छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना सदरेच्या मुख्य चौथऱ्यावर करण्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. हे काम तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली युद्ध पातळीवर सुरू आहे. आणि उत्तर विभागाचे आमदार अनिल बेनके यांच्याकडून कामाची व्यवस्था बघण्यात येत आहे. बेळगावात अनेक चौक आहेत त्यापैकी धर्मवीर संभाजी चौक हा …
Read More »LOCAL NEWS
वेणूग्राम सायकलिंग क्लबचा वर्धापन दिन साजरा
बेळगाव : उत्तर कर्नाटकातील सर्वात मोठा फिटनेस क्लब असलेल्या वेणूग्राम सायकलिंग क्लब बेळगावचा 5 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बेळगावच्या वेणुग्राम सायकलिंग क्लबतर्फे आठवडाभर गटागटाने सायकलिंग, धावणे आणि जलतरणाचे उपक्रम राबविले जातात. ग्रुपच्या नुकत्याच साजरा झालेल्या पाचव्या वर्धापन दिन समारंभास 183 नोंदणीकृत सदस्यांपैकी सुमारे 135 जण …
Read More »ग्रीन एनर्जी कॉरिडॉर : नवीन पॉवर लाईन्स राज्यहिताला ठरतील पूरक आणि पोषक
बेळगाव / धारवाड : बेळगाव आणि धारवाड जिल्ह्यांमध्ये टाकण्यात येणार्या नवीन पॉवर लाईन्समुळे कर्नाटकात अक्षय ऊर्जा प्रसारित करण्यात मदत होईल आणि उत्पादित ऊर्जा दक्षिण आणि पश्चिमेकडील ग्रीड्समधून कार्यक्षमतेने बाहेर काढण्यास मदत होईल. इतकेच नाही तर सौर आणि पवन ऊर्जा निर्मितीमध्ये कर्नाटकाचे स्थान देशात बळकट होईल. अशा हालचालीमध्ये नरेंद्र-झेल्डेम ट्रान्समिशन …
Read More »अनधिकृत लाल पिवळ्या झेंड्या विरोधी आंदोलन प्रकरणी विशेष सुनावणी
बेळगाव : अनधिकृत लाल-पिवळ्या झेंड्याच्या विरोधी तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंग व कर्नाटकाचे जनसंपर्क खात्याशी पत्रव्यवहार करून अनधिकृत लाल-पिवळ्या व त्यामुळे होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान निदर्शनास आणून देण्यात आला होता. या प्रकरणी तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांशी सल्ला-मसलत करून त्यावर कारवाई करून तो झेंडा हटवण्यास सांगण्यात आले होते. इतका राष्ट्रध्वजाचा …
Read More »क्षुल्लक कारणावरून युवकावर प्राणघातक हल्ला
बेळगाव : कचरा टाकताना दुचाकीला हात लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून युवकावर चौघांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना बेळगावातील भाग्यनगर येथे घडली आहे. भाग्यनगर पहिला क्रॉस येथील दत्त मंदिराजवळ काल, मंगळवारी रात्री आशिष शेणवी कचरा टाकण्यासाठी जात होता. यावेळी चुकून त्याचा हात रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकीला लागला. यावरून दुचाकीस्वाराने त्याच्याशी भांडण करून …
Read More »चाबूक मोर्चा संदर्भात बिजगर्णी, बेळगुंदी येथे जनजागृती
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीने येत्या 28 नोव्हेंबर रोजी रिंग रोड विरोधात पुकारलेल्या चाबूक मोर्चा संदर्भात बिजगर्णी, बेळगुंदी येथे काल दि. 22 रोजी जनजागृती करण्यात आली. बैठकीत कल्लाप्पा भास्कर सर यांनी बहुसंख्येने शेतकरी मोर्चाला सहभागी होतील, अशी ग्वाही दिली. यावेळी माजी आमदार मनोहर किणेकर, युवा नेते आर. एम. …
Read More »महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्न तापणार! जत तालुक्यावर कर्नाटक सरकारचा दावा
बेळगाव : महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्न अजूनही सुटला नसताना आता कर्नाटक राज्य सरकारकडून नवी कुरापत सुरू आहे. महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर कर्नाटक दावा सांगण्याचा गांभीर्यानं विचार करत असल्याचं कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितलं आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालुका हा दुष्काळी आहे. तिथे पाण्याची तीव्र टंचाई भासते. यामुळं तेथील …
Read More »येळ्ळूर येथे शुक्रवारी ‘रिंगरोड’विरोधात जनजागृती बैठक
येळळूर : ‘रिंगरोड’विरोधात सोमवार दिनांक 28 रोजी नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘चाबूक मोर्चा’ काढण्याचा निर्णय तालुका म. ए. समितीने घेतला आहे. सदर मोर्चाला पाठिंबा देऊन जनजागृती करण्यासाठी येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने शुक्रवार दिनांक 25 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता श्रीचांगळेश्वरी देवालयात ‘जनजागृती सभे’चे आयोजन करण्यात आले आहे. या …
Read More »हिंडलगा ग्राम पंचायतीकडून सीसीटीव्ही बसवण्यास सुरुवात
बेळगाव : हिंडलगा पंचायतीने कचरा फेकणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला आहे. बेळगाव तालुक्यातील हिंडलगा ग्रामपंचायतीच्या व्याप्तीत नागरिक सर्वत्र कचरा टाकत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीने कचरा टाकणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी अभिनव उपाय योजिला आहे. मंगळवारी ग्रा.पं.चे अध्यक्ष नागेश मन्नोळकर यांनी सीसी कॅमेरे बसवण्याच्या कामाला सुरुवात केली. तसेच ग्रामपंचायतीने कचरा टाकणाऱ्यांना …
Read More »विद्यार्थ्याची वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या
बैलहोंगल : समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बैलहोंगल शहरात घडली आहे. परशुराम कोनेरी (रा.कोडीवाड, ता. बैलहोंगल) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. इतर विद्यार्थी कॉलेजला निघून गेल्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. कॉलेजमधून परतल्यानंतर विद्यार्थ्याने दरवाजा अवघडल्याने इतर विद्यार्थ्यांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta