Sunday , July 26 2026
Breaking News

अनधिकृत लाल पिवळ्या झेंड्या विरोधी आंदोलन प्रकरणी विशेष सुनावणी

Spread the love

 

बेळगाव : अनधिकृत लाल-पिवळ्या झेंड्याच्या विरोधी तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंग व कर्नाटकाचे जनसंपर्क खात्याशी पत्रव्यवहार करून अनधिकृत लाल-पिवळ्या व त्यामुळे होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान निदर्शनास आणून देण्यात आला होता.

या प्रकरणी तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांशी सल्ला-मसलत करून त्यावर कारवाई करून तो झेंडा हटवण्यास सांगण्यात आले होते.
इतका राष्ट्रध्वजाचा सेन्सिटिव्ह इशू.तत्कालीन जिल्हाधिकारी एन. जयराम यांनी नॉन्सेन्स अशी उपमा देऊन राष्ट्रध्वजाचा सुद्धा अवमान केला. त्यामुळे राष्ट्रध्वजापेक्षा हा अनधिकृत झेंडा श्रेष्ठ का असं जनसामान्यातून बोलले जात आहे.

पोलिस प्रशासनाच्या द्वारे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात खोट्या साक्षी देवून. नाहक त्रास देण्याचा प्रयत्न खोट्या केसेस मध्ये गोवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. कार्यकर्त्यांची शैक्षणिक, मानसिक, आर्थिक हानी करण्याचा प्रयत्न या माध्यमातून सुरू आहे हे उघड पणे दिसते आहे. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते सचिन पाटील यांनी जामीन दिला.

महाराष्ट्र एकीकरण समितीचे वकील महेश बिर्जे, रीच म्यान रीकी, बाळासाहेब कागणकर उपस्थित होते. यावेळी सुरज कणबरकरसह अजित कोकणे, मनोज पावशे, सुधीर कालकुंद्रीकर, नारायण किटवाडकर त्याचबरोबर सतीश गावडोजी हजर होते.

जय महाराष्ट्र.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *