Monday , September 21 2026
Breaking News

क्षुल्लक कारणावरून युवकावर प्राणघातक हल्ला

Spread the love

 

बेळगाव : कचरा टाकताना दुचाकीला हात लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून युवकावर चौघांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना बेळगावातील भाग्यनगर येथे घडली आहे.

भाग्यनगर पहिला क्रॉस येथील दत्त मंदिराजवळ काल, मंगळवारी रात्री आशिष शेणवी कचरा टाकण्यासाठी जात होता. यावेळी चुकून त्याचा हात रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकीला लागला. यावरून दुचाकीस्वाराने त्याच्याशी भांडण करून आपल्या मित्रांना बोलावून घेतले. त्यानंतर पुन्हा मोठा वाद झाला. त्यातच चौघांनी आशिषला बेदम मारहाण केली. एकाने रस्त्यावर पडलेला दगड उचलून आशिषच्या कपाळावर जोराने मारला. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. यावेळी स्थानिक लोक जमा झाल्याने हल्लेखोर युवकांनी आपल्या दुचाकी घटनास्थळीच टाकून पोबारा केला. या प्रकरणी टिळकवाडी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *