Saturday , November 7 2026
Breaking News

विद्यार्थ्याची वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love

बैलहोंगल : समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बैलहोंगल शहरात घडली आहे.

परशुराम कोनेरी (रा.कोडीवाड, ता. बैलहोंगल) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. इतर विद्यार्थी कॉलेजला निघून गेल्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. कॉलेजमधून परतल्यानंतर विद्यार्थ्याने दरवाजा अवघडल्याने इतर विद्यार्थ्यांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेची बैलहोंगल पोलीस स्थानकात नोंद झाली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *