Thursday , November 21 2024
Breaking News

LOCAL NEWS

दैवज्ञ ब्राह्मण शिक्षण संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांचा सत्कार

  बेळगाव : “नाना शंकर शेठ सारखी अनेक रत्ने जन्माला येतात तेव्हा समाजाचा उद्धार होतो, अशा उत्तुंग व्यक्तिमत्त्वांचे जीवन कार्य या तरुण पिढीला समजण्याची गरज आहे त्याकरिता “पृथ्वीपती” हे नानांचे चरित्र असलेले पुस्तक या पिढीच्या हाती देण्याची जबाबदारी पालकांची आहे” असे विचार प्रख्यात अभिनेते प्रसाद पंडित यांनी बोलताना व्यक्त केले. …

Read More »

बळ्ळारी नाल्याची सफाई करून काँक्रीटीकरण करावे; शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

  बेळगाव : शेतकऱ्यांना वरदान ठरावा यासाठी निर्माण करण्यात आलेला बळ्ळारी नाला शेतकऱ्यांना शाप ठरत असून पावसाळ्यात या नाल्याला येणाऱ्या पुरामुळे शेतकऱ्यांना नरकयातना भोगाव्या लागत आहेत. बळ्ळारी नाल्याची लवकरात लवकर स्वच्छता करून काँक्रीटीकरण करण्यात यावे, अशी मागणी शेती सुधारणा युवक मंडळ वडगाव, बेळगाव यांच्यातर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. …

Read More »

सहकार महर्षी कै. अर्जुनराव घोरपडे जन्मशताब्दी समितीच्या वतीने आवाहन

  बेळगाव : सहकार महर्षी कै. अर्जुनराव घोरपडे यांच्या जन्मशताब्दी निमित्त जन्मशताब्दी समितीच्या वतीने एक स्मरणिका प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या स्मरणिकेत कैलासवासी अर्जुनराव घोरपडे यांच्या संदर्भातील काही फोटो छापावयाचे आहेत. बेळगावमधील काही संस्था आणि व्यक्ती यांच्याकडे असे फोटो असतील तर ते कृपा करून नितीन आनंदाचे जिजामाता बँक, संजय गुरव …

Read More »

निःपक्षपातीपणे सर्वे करून भरपाई द्यावी

  रयत संघटनेची मागणी; खासदार जगदीश शेट्टर यांची भेट निपाणी (वार्ता) : जुलै महिन्यात पडलेल्या पावसामुळे बेळगावसह निपाणी, चिकोडी परिसरातील झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याशिवाय अनेक घरांची पडझड झाली आहे. पाऊस कमी झाला असून पूर परिस्थिती आहे. नद्यांची पाणीपातळी कमी झाल्यानंतर नुकसानीचा नि:पक्षपातीपणे सर्वे करून संबंधितांना …

Read More »

विद्यार्थी व पालकांत सुसंवाद असणे गरजेचे : प्राध्यापक डॉ. उदय पाटील

  मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा बेळगाव : विद्यार्थ्यांना त्यांच्या कलेने निर्णय घेण्यासाठी विद्यार्थी व पालकांत सुसंवाद असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. उदय पाटील यांनी केले. मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या …

Read More »

दारूच्या नशेत मुलाकडून आईची हत्या

  बैलहोंगल : दारूच्या नशेत मुलाने आईची हत्या केल्याची घटना बैलहोंगल तालुक्यातील उडीकेरी गावात घडली. महादेवी गुरप्पा तोलगी (७०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तिचा मुलगा इराण्णा गुराप्पा तोलगी (वय ३४) याने तिचा दारूच्या नशेत खून केला त्याच्या नावावर शेती करावी तसेच पैशासाठी तो कायम आपल्या आईला त्रास देत …

Read More »

येळ्ळूर लक्ष्मी चौकाच्या सुशोभिकरणाला सुरुवात; नागरिकांतून समाधान व्यक्त

  पेव्हर्स बसविण्याचे काम सुरु येळ्ळूर : येळ्ळूर गावातील एक मुख्य चौक असलेल्या लक्ष्मी चौकाचे सुशोभीकरण बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या सहकार्यातून होत आहे, आमदार अभय पाटील यांनी या चौकाचे सुशोभीकरण करण्यासाठी स्पेशल फंड मंजूर केला असून, त्यांच्या सहकार्यातूनच लक्ष्मी चौकाच्या सौंदर्यीकरणाचे काम सुरू झाले आहे. संपूर्ण चौकात पेव्हर्स …

Read More »

अलतगा येथील दुर्घटनेतील “त्या’ युवकाचा मृतदेह सापडला

  बेळगाव : अलतगाहून कंग्राळी (खुर्द)कडे कटिंग करायला दुचाकीवरून जात असताना दुचाकी नाल्यात कोसळून झालेल्या अपघातानंतर नाल्याच्या पाण्यातून वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह शोधून काढण्यात एसडीआरएफ टीमला यश आले आहे. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास “त्या” युवकाचा मृतदेह सापडला. शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास अलतगा युवक ओंकार पाटील हा वाहून गेला होता रविवारी …

Read More »

येत्या ७२ तासांत मुसळधार पाऊस; हवामान खात्याचा इशारा

  बंगळुरू : यंदा पावसाने भीषण पूरस्थिती निर्माण केली असून, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी हवामान खात्याने पुढील ७२ तास ३ दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पावसाळा संपायला अजून २ महिने बाकी आहेत. म्हणजेच सप्टेंबर २०२४ पर्यंत मान्सून पाऊस पडेल. असे असले तरी अवघ्या २ महिन्यात पावसाच्या …

Read More »

अलतगाजवळ कालव्यात दुचाकी वाहून गेली; एक बचावला तर दुसरा बेपत्ता..

  बेळगाव : अलतगा गावातून दुचाकीवरून शेजारील कंग्राळी गावात कटिंग करण्यासाठी गेलेले दोन तरुण अलतगाजवळ कालव्यात पुराच्या पाण्यातून वाहून गेल्याची घटना आज सायंकाळी घडली असून एक बचावला आहे तर दुसरा तरुण बेपत्ता झाल्याचे समजते. अलतगा गावातील ओंकार पाटील व ज्योतिनाथ पाटील नावाचे दोन तरुण कंग्राळी येथून त्यांच्या मूळ गावी अलतगा …

Read More »