Monday , September 21 2026
Breaking News

विसर्जन मिरवणुकीत “श्री गणेश प्रसादा”चे वाटप; सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे कौतुक

Spread the love

 

बेळगाव : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पुढाकारातून यावर्षी गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी येणाऱ्या भक्तांसाठी “श्री गणेश प्रसादा”चे आयोजन करण्यात आले होते. शहरातील मध्यवर्ती भागातील हुतात्मा चौक तसेच छत्रपती शिवाजी उद्यान या ठिकाणी स्टॉल लावून शिस्तबद्धरित्या प्रसादाचे वाटप करण्यात आले.

गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सरकारी कोट्यातून सदर “प्रसाद” करण्याचे निश्चित केले होते परंतु सत्ताधारी नगरसेवकांनी महानगरपालिकेत या विषयावरून गदारोळ घातला व या “प्रसादा”ला विरोध केला. तथाकथित हिंदुत्ववादी पक्षाच्या नगरसेवकांनी गणेशोत्सवात होणाऱ्या प्रसादाला विरोध केल्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी पुढाकार घेत सदर “प्रसाद” सार्वजनिक महामंडळातर्फे आयोजित केला. या महाप्रसादाचा कोणताही खर्च सरकारी तिजोरीवर न टाकता केवळ लोकवर्गणीतून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने महाप्रसादाचे वाटप केले. यासाठी मराठा मंदिर येथे शनिवारी सकाळपासूनच महाप्रसादाची तयारी सुरू करण्यात आली होती. गणेशोत्सव महामंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्वतः जातीने लक्ष घालत महाप्रसाद पॅकिंग करण्यापासून ते शहरात ठिकठिकाणी वाटप करण्यापर्यंतची जबाबदारी मोठ्या उत्साहाने स्वीकारली होती. गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या हजारो गणेश भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. महामंडळाच्या या कार्याबद्दल गणेश भक्तातून कौतुक होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *