Friday , May 1 2026
Breaking News

अनुदानित शाळांमधील अतिथी शिक्षकांनाही वेतन देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर

Spread the love

 

बेळगाव : अनुदानित शाळांमधील अतिथी शिक्षकांनाही सरकारकडून वेतन देण्याबाबत प्रयत्न करणार, असे आश्वासन महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिले आहे.

रविवारी बेळगावमधील त्यांच्या निवासस्थानी ‘विश्व भारत सेवा समिती’च्या वतीने आयोजित निवृत्त आणि कर्तृत्ववान शिक्षक व शेतकऱ्यांच्या सत्कार समारंभाचे उद्घाटन करताना त्या बोलत होत्या. अनेक संस्थांच्या प्रतिनिधींनी अनुदानित शाळांमधील अतिथी शिक्षकांना वेतन देण्याबाबत मला विनंती केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांशी चर्चा करून योग्य ती पाऊले उचलण्याचा प्रयत्न करेन, असे त्यांनी सांगितले.

लक्ष्मी हेब्बाळकर पुढे म्हणाल्या, “शिक्षकांचे स्थान खूप मोठे आहे. सर्वसामान्यांपासून राष्ट्रपतींपर्यंत प्रत्येकाच्या यशामागे शिक्षकांचा हात असतो. त्यामुळे समाजात शिक्षकांना खूप मान-सन्मान मिळतो. मी आज ज्या पदावर आहे, त्याचे कारण शिक्षकच आहेत. त्यांनी दिलेली संस्कृती आणि शिकवण मी कधीच विसरणार नाही.” ‘विश्व भारत सेवा समिती’ गेल्या ६६ वर्षांपासून खूप चांगले काम करत आहे आणि त्यांनी अनेकांचे भविष्य घडवले आहे. या संस्थेला सर्वतोपरी मदत करण्यासाठी मी तयार आहे, असेही मंत्र्यांनी सांगितले.

यावेळी महाराष्ट्राचे माजी मंत्री भरमू पाटील, माजी आमदार परशुरामभाऊ नंदीहळ्ळी, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, विश्व भारत सेवा समितीचे अध्यक्ष विजय नंदीहळ्ळी, शिक्षण अधिकारी आंजनेया आर.के., मनोहर बेळगावकर, यल्लाप्पा बेळगावकर, बसवराज हट्टीहोळी, बवराज तेरेसे, यशवंत सोनार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

विजयदुर्ग खाडीतील जलतरण स्पर्धेत हर्षवर्धनला सुवर्ण तर स्मरण, गाथा, गनीष्का यांना रौप्य पदके

Spread the love  बेळगाव : जिम स्विम अकॅडमी कोल्हापूर तसेच सिंधुदुर्ग क्रीडा व सांस्कृतिक मंडळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *