बेळगाव : अलीकडच्या अतिवृष्टीमुळे कमकुवत झालेले घर अचानक कोसळून सुमारे 1.50 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना रघुनाथ पेठ अनगोळ येथे शुक्रवारी दुपारी घडली. अचानक घडलेल्या या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. कोसळलेले घर प्रकाश महादेव होळकर या भाजी विक्रेत्याच्या मालकीचे आहे. प्रकाश हा रस्त्याकडेला भाजी विक्री करण्याचा व्यवसाय करतो. …
Read More »LOCAL NEWS
शेतकर्यांचे हित लक्षात घेऊन कार्यवाही : मंत्री गोविंद कारजोळ
बेळगाव : पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करताना शेतकर्यांचे हित लक्षात घेऊन कार्यवाही करावी. संयुक्त पाहणीनंतरही काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाले असून त्याचा समावेश करावा, अशा सूचना जिल्हा प्रभारी मंत्री गोविंद कारजोळ यांनी दिल्या. आज शनिवारी अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान आणि अलीकडच्या काळात केलेल्या उपाययोजनांबाबत झालेल्या अधिकार्यांच्या बैठकीत ते अध्यक्षस्थानी होते. जिल्ह्यात …
Read More »गोजगे येथे ’लम्पी-स्किन डिसीज’ लसीकरण शिबीर
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या निवेदनाला सकारात्मक प्रतिसाद देऊन ’पशुसंगोपन-वैद्यकीय विभाग’ बेळगांव यांच्या सहाय्यक संघसमुहाकडून आज दि. 17 सप्टेंबर रोजी गोजगे येथे ’लम्पी-स्किन डिसीज’ या गाई, म्हशी आणि बैलांमध्ये होणार्या रोगाचा प्रसार आणि प्रादुर्भाव विचारात घेऊन पूर्वखबरदारीखातर लसीकरण शिबीर राबविण्यात आले. यावेळी सरकारी दवाखाना आंबेवाडी-गोजगा-मण्णूर येथील डॉ. प्रदीप हन्नूरकर, डॉ. …
Read More »द्राक्ष उत्पादकांचा प्रश्न विधानसभेत मांडणार
आ. श्रीमंत पाटील यांनी घेतली विधानसभा अध्यक्षांची भेट बेळगाव : कागवाड व अथणी तालुक्यात अनेक शेतकरी द्राक्ष पीक घेतात. मात्र, गेल्या दोन – तीन वर्षात पावसामुळे आणि वादळामुळे द्राक्ष पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, शासन नियमानुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांच्या समस्यांवर सभागृहात चर्चा …
Read More »17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत ग्रामीण भाजपतर्फे विविध उपक्रम : धनंजय जाधव
बेळगाव : आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेसह सर्व देशांच्या नेत्यांपेक्षा अधिक लोकप्रिय आहेत. उद्या 17 सप्टेंबरला त्यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत बेळगाव तालुक्याच्या ग्रामीण भागात भाजपतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती भाजप ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष धनंजय जाधव यांनी पत्रकार परिषदेत …
Read More »विश्वकर्मा पांचाळ मनुमय संस्थेचा अमृत महोत्सव साजरा
दोन दिवस भर गच्च कार्यक्रम बेळगाव : “कन्याकुमारी पासून बद्रीनारायण पर्यंत आणि पार काश्मीर पर्यंत जी अनेक मंदिरे, शिल्पकला, मुर्त्या निर्माण केल्या आहेत त्या सर्व श्री विश्वकर्मा आणि त्यांच्या वारसदारांनी. प्राचीन शिल्पी जकणाचारीपासून आता आत्तापर्यंतच्या आधुनिक शिल्पकारांपर्यंत सर्व जगाची सेवा करणारा समुदाय म्हणजे विश्वकर्मा समुदाय होय” असे विचार विश्वकर्मा जगद्गुरु …
Read More »यूट्यूब चॅनेलवर बंदीची माहिती खोटी : जिल्हाधिकारी नितेश पाटील
बेळगाव : यूट्यूब चॅनेलवर बंदी घालण्यात आली आहे, अशी ‘मीडिया रिलीज’ सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आली आहे. सदर माहिती दिशाभूल करणारी आणि सत्यापासून दूर आहे. बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अशी कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही, असे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केले आहे. युट्युब चॅनेलवर बंदी घातली जाईल अशी बनावट …
Read More »केपीटीसीएल परीक्षा गैरप्रकारातील आणखी तीन आरोपी अटकेत
बेळगाव : केपीटीसीएलच्या परीक्षेतील गैरप्रकारांचे जाळे दिवसेंदिवस खोलवर जात आहे. बेळगाव जिल्हा पोलीस विभागाकडून एकेक आरोपींना अटक करण्यात येत आहे. आज आणखी तीन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले. बेळगावचे एसपी डॉ. संजीव पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी या प्रकरणी यापूर्वीच १७ आरोपींना अटक केली असून आजपर्यंत अटक केलेल्यांची संख्या …
Read More »…अन्यथा शिवभक्तच शिवसृष्टीचे उद्घाटन करतील : रमाकांत कोंडुसकर
बेळगाव : बेळगावात उभारण्यात येत असलेल्या शिवसृष्टीच्या कामाला बराच विलंब होत आहे. त्यामुळे येत्या 1 महिन्यात शिवसृष्टीचे उद्घाटन करण्याची मागणी श्रीराम सेना हिंदुस्थान संघटनेने केली आहे. महिन्यात शिवसृष्टीचे उद्घाटन न केल्यास आम्हीच उद्घाटन करू, असा इशाराही देण्यात आला. बेळगावातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्राची माहिती …
Read More »उद्या विविध ठिकाणी विद्युत अदालत
बेळगाव : ग्रामीण भागातील विजेच्या समस्या सोडविण्यासाठी उद्या शनिवारी बेळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील गावांमध्ये विद्युत अदालतचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील लोकांच्या विजेच्या समस्येवर तत्काळ तोडगा काढण्यासाठी ऊर्जा विभाग, हुबळी वीज पुरवठा कंपनी/हेस्कॉम यांच्या वतीने दर महिन्याच्या तिसर्या शनिवारी बेळगाव मंडळात विद्युत अदालत घेण्यात येते. त्यानुसार शनिवारी सकाळी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta