Monday , December 15 2025
Breaking News

LOCAL NEWS

भाजप नेत्याच्या हत्येचा तपास लवकरच एनआयएकडे : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई

  बेंगळुरू : कर्नाटकातील भाजपच्या युवा मोर्चा समितीचे सदस्य प्रवीण नेत्तर यांच्या हत्येप्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महत्वपूर्ण विधान केले आहे. बसवराज बोम्मई म्हणाले की, प्रवीण नेत्तर यांच्या हत्येचा तपास आम्ही लवकरच एनआयएकडे सुपूर्द करणार आहोत. भाजप नेते प्रवीण नेत्तर यांची २६ जुलैला कर्नाटकच्या सुलिया येथे हत्या करण्यात आली …

Read More »

४८ तासातील दुसऱ्या हत्येनंतर मंगळूरमध्ये तणाव

प्रतिबंधात्मक आदेश, तणावपूर्ण परिस्थितीत दफन बंगळूर : गुरूवारी (ता. २८) रात्री सुरतकल येथे हत्या झालेल्या मोहम्मद फाजिल (वय २३) च्या हल्लेखोरांची ओळख पटवून त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिसांचे सतत प्रयत्न सुरू असतानाच, त्याच्या पार्थिवावर मंगलपेठे येथे जवळच्या मशिदीत धार्मिक विधींसह अंतसंस्कार करण्यात आले. गुरूवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी सुरतकल येथे त्याची …

Read More »

‘अथणी शुगर्स’ला इंडस्ट्री एक्सलन्सी अवॉर्ड

गोवा येथे आंतरराष्ट्रीय शुगर एक्स्पो समारंभात प्रदान : केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री, गोवा मुख्यमंत्र्यांची उपस्थिती अथणी : अथणी शुगर्स लि., ला उत्कृष्ट उद्योजक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. गोवा राज्यातील पणजी येथे नुकताच आंतरराष्ट्रीय 80 वा वार्षिक शुगर एक्स्पो 2022 समारंभ झाला. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री …

Read More »

देवेंद्र जिनगौडा शाळेत विद्या भारती विज्ञान मेळाव्याचे आयोजन

बेळगांव : शिंदोळी येथील गोपाळ जिनगौडा एज्युकेशन ट्रस्ट संचालित देवेंद्र जिनगौडा इंग्रजी शाळेमध्ये विद्याभारती बेळगांव जिल्हास्तरीय ज्ञान विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून बुडा आयुक्त प्रितम नसलापुरे, संस्थेचे अध्यक्ष गोपाळ जिनगौडा, उपाध्यक्ष संदीप चिपरे, विद्याभारती प्रांत अध्यक्ष परमेश्वर हेगडे, विद्याभारती जिल्हा अध्यक्ष राघवेंद्र कुलकर्णी, संस्थेचे सेक्रेटरी कुंतुसागर …

Read More »

अवैधरित्या चालवल्या जाणाऱ्या बनावट फेसबुक अकाऊंटसवर कारवाई करा

  बेळगाव : फेसबुकवर बनावट अकाऊंट काढून पत्रकार, महिला, नागरिक यांची बदनामी करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे केली आहे. शुक्रवार दिनांक 29 जुलै 2022 रोजी बेळगाव पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांची पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन काही फेसबुक अकाऊंटची चौकशी करा, अशी …

Read More »

कॅन्टोन्मेंट बोर्ड उभारणार बहुमजली व्यापारी संकुल!

  बेळगाव : महसूल वाढविण्यासोबत थकबाकी वसूल करण्यासाठी पाऊले उचलण्याचा निर्णय बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या बैठकीत घेण्यात आला. त्याकरिता बहुमजली व्यापारी संकुल उभारणीच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली. ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या बैठकीत विविध मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. पाणी समस्येबाबत चर्चा करताना 24 तास पाणी पुरवठा योजनेच्या कक्षेत कॅन्टोन्मेंट …

Read More »

प्रवीण हत्येप्रकरणी दोघाना अटक; पोलिसांकडून कसून चौकशी

  बंगळूर : भारतीय जनता पक्ष (भाजप) युवा मोर्चा कार्यकर्ता प्रवीण नेत्तारू यांच्या हत्येप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी गुरुवारी दक्षिण कन्नड जिल्ह्यातून दोघांना अटक केली. सावनूर येथील झाकीर (वय २९) आणि बेल्लोरेचा शफीक (वय २७) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत, अशी माहिती दक्षिण कन्नडचे पोलीस अधीक्षक ऋषिकेश सोनवणे यांनी दिली. …

Read More »

सोशल मीडियावर तरुणीचा फोटो वापरून तरुणांची फसवणूक करणाऱ्याला अटक

बेळगाव : तरुणीचा फोटो वापरून बनावट फेसबुक अकाउंट उघडून तरुणांची फसवणूक करणाऱ्या एका व्यक्तीला बेळगाव पोलिसांनी अटक करून कारागृहात पाठवले. महांतेश मूडसे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याने एम. स्नेहा नावाने बनावट फेसबुक अकाऊंट उघडले. तो बेळगाव जिल्ह्यातील निपाणी तालुक्यातील नाईहिंग्लज गावचा रहिवासी आहे. त्याने पीएसआयची शारीरिक चाचणी …

Read More »

‘सर्वांना हवेसे असणारे अंबेडकर’ पुस्तकाचे प्रकाशन

  बेळगाव : कर्नाटकातील प्रसिध्द लेखक डॉ. जी. बी. हरिश यांनी ‘यल्लरिगु बेकाद अंबेडकर…गोत्तेइरद अवेष्टो संगतीगळु’ हे कन्नड पुस्तक लिहिले आहे. याचा मराठी अनुवाद बेळगावातील ख्यात साहित्यिक व अनुवादक श्री. अशोक बाबुराव भंडारी यांनी केला आहे. याचे नाव ‘सर्वांना हवेसे असणारे अंबेडकर…माहीतच नसलेल्या अनेक गोष्टी’ या पुस्तकाचा प्रकाशन कार्यक्रम साध्या …

Read More »

बेळगावात विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी मजुरांचे आंदोलन

  बेळगाव : रोजगार हमी योजनेंतर्गत काम करणार्‍या मजुरांच्या विविध मागण्या पूर्ण कराव्यात या मागणीसाठी बेळगावात गुरुवारी ग्रामीण कुली कामगार संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. ग्रामीण कुली कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी निदर्शने करून आंदोलन करण्यात आले. कुली कामगारांना फेब्रुवारी, मार्च 2021 आणि एप्रिल, मे, जून 2022 या …

Read More »