Sunday , July 26 2026
Breaking News

बेळगावात विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी मजुरांचे आंदोलन

Spread the love

 

बेळगाव : रोजगार हमी योजनेंतर्गत काम करणार्‍या मजुरांच्या विविध मागण्या पूर्ण कराव्यात या मागणीसाठी बेळगावात गुरुवारी ग्रामीण कुली कामगार संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
ग्रामीण कुली कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी निदर्शने करून आंदोलन करण्यात आले. कुली कामगारांना फेब्रुवारी, मार्च 2021 आणि एप्रिल, मे, जून 2022 या महिन्यांचे वेतन देण्यात आलेले नाही. ही मजुरीची रक्कम त्वरित देऊन विविध मागण्यांची पूर्तता करावी, या मागणीचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना कामगार नेते विश्वेश्वरय्या हिरेमठ म्हणाले की, आम्ही काम करत असताना फावडे, टोपल्या आणि कुदळ आणायचो. त्यासाठी ते दररोज दहा रुपये भाडे घसारा देत असत. मात्र जून महिन्यात हे काम बंद करण्यात आले आहे. 10 रुपयांऐवजी तात्काळ 25 रुपये मजुरी आणि यंत्रसामग्रीच्या अतिरिक्त खर्चाची रक्कम द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
बेळगाव, बैलहोंगल, रामदुर्ग, सौंदत्ती, गोकाक, हुक्केरी, खानापूर, कित्तूर तालुक्यातील मजूर आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी दिलीप कामत, अशोक हेरेकर, यल्लाप्पा, अनिता बेळगावकर, महादेवी, गौरव्वा बेवीनकट्टी, भारती भांदुर्गे, वनिता पाटील, सागरिका हुंदरे आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *