Monday , December 15 2025
Breaking News

LOCAL NEWS

नामदेव विठ्ठल मंदिरात एकादशीनिमित्त जोगळेकर यांचे कीर्तन

बेळगाव : श्री नामदेव विठ्ठल मंदिर शहापूर, येथे प्रसिद्ध कीर्तनकार हभप हर्षदबुवा जोगळेकर (पुणे) यांची कीर्तने होणार आहेत. शनिवार दि. 9 ते सोमवार दि. 11 जुलैपर्यंत संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत कीर्तन होईल. मागील दोन वर्षात आषाढी एकादशी उत्सव सोहळा मोठ्या प्रमाणात होऊ शकला नाही. यावर्षी होणार्‍या कीर्तनाचा लाभ …

Read More »

दुभाजकाला धडकून हलगा येथील दुचाकीस्वार ठार

बेळगाव : दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुभाजकाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात हलगा येथील दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना बी. एस. येडीयुरप्पा मार्गावर घडली आहे. सुदर्शन विजय पाटील (वय 22) रा. महावीरनगर हलगा बेळगाव असे या अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. सदर अपघात मंगळवारी संध्याकाळी सहाच्या दरम्यान घडला. रहदारी दक्षिण पोलिसांनी दिलेल्या …

Read More »

येळ्ळूर येथे डेंग्यू संदर्भातील जनजागृतीची बैठक

बेळगाव : ग्राम पंचायत येळ्ळूर व प्राथमिक आरोग्य केंद्र येळ्ळूर यांची आज येळ्ळूर येथे डेंग्यू संदर्भात जनजागृतीची बैठक झाली. येळ्ळूर व आवचारहट्टी गावामध्ये डेंग्यू रोगाचे काही रुग्ण सापडले आहेत. यासाठी खबरदारी म्हणून ग्राम पंचायत येळ्ळूर व प्राथमिक आरोग्य केंद्र येळ्ळूर यांची येळ्ळूर ग्राम पंचायत कार्यालयामध्ये बैठक घेऊन या बैठकीमध्ये डॉ. …

Read More »

पर्यावरणाचे संवर्धन करणे काळाची गरज : सुनिल चौगुले

जे. के. फाउंडेशनतर्फे व्याख्यान, वृक्षारोपण आणि वृक्षवाटप बेळगांव : मानव इतर सजीवांपेक्षा बुद्धीमान असला तरी तो सुद्धा पर्यावरणाचाच एक घटक आहे. हे विसरता कामा नये नैसर्गिक पर्यावरणात बदल घडवण्याची क्षमता केवळ मानवाकडे आहे. त्यामूळे पर्यावरणातील प्रत्येक घटकांचे संरक्षण करणे, त्याचा काळजीपूर्वक वापर करणे मानवाचे आद्यकर्तव्य आहे. हे आपण ओळखले पाहिजे. व …

Read More »

ग्रामीण भागात जलजीवन मिशन योजनेची सुरूवात

बेळगाव : आज अरळीकट्टी, बसापूर, हुलिकवि, नेगेरहाळ, नंदिहळी, राजहंसगड, सुळगा. आदि गावामध्ये बेळगावच्या खासदार श्रीमती मंगला अंगडी यांच्याहस्ते जलजीवन मिशन योजनेची सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात अरळीकट्टी येथून अरळीकट्टी मठाचे मठाधीश श्री शिवमूर्ती देवरु विरक्त मठ यांच्या अमृतहस्ते करण्यात आली. प्रसंगी भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष श्री. धनंजय जाधव म्हणाले, …

Read More »

चंद्रशेखर गुरुजींच्या दोन मारेकऱ्यांना अटक, हत्येमध्ये एका महिलेचा समावेश असल्याचं स्पष्ट

बेळगाव: गुरुजी डॉ.चंद्रशेखर यांच्या हत्येनंतर काही तासात त्यांच्या मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. पोलिसांनी दोन मारेकऱ्यांना बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग येथे अटक केली असून ते गुरुजींचे निकटवर्तीय असल्याची माहिती समोर आली आहे. महांतेश शिरोळ आणि मंजुनाथ दुमवाड अशी मारेकऱ्यांची नावे आहेत. या हत्येत वनजाक्षी या महिलेचा सहभाग असल्याचे उघड …

Read More »

धूपटेश्वर मंदिरात पावसासाठी गाऱ्हाणे

बेळगाव : प्रतिवर्षाप्रमाणे हनुमाननगर येथील धूपटेश्वर मंदिरात गाऱ्हाणे घालून बेळगाव व परिसरातील जनतेसाठी पाऊस मागण्याचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. कंग्राळ गल्लीतील पंचमंडळ सल्लागार मंडळ व शेतकरी संघटना यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सुरवातीस उपस्थित मान्यवर व पंचमंडळीच्या हस्ते पूजा करण्यात आली. देवस्थान मंडळाचे अध्यक्ष श्री. रणजित …

Read More »

‘सरळ वास्तू’चे प्रख्यात ज्योतिषी चंद्रशेखर गुरुजी यांची निर्घृण हत्या

हुबळी : ‘सरळ वास्तू‘चे जगप्रसिद्ध ज्योतिषी चंद्रशेखर गुरुजी यांची हुबळीत निर्घृण हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.होय, ‘सरळवास्तू’ या वास्तुशास्त्र मार्गदर्शन संस्थेच्या माध्यमातून प्रसिद्धीस आलेले प्रख्यात वास्तुतज्ञ चंद्रशेखर गुरुजी यांची आज मंगळवारी हुबळीतील उणकल परिसरातील एका खासगी हॉटेलमध्ये अज्ञात मारेकऱ्यांनी चाकूने वार करून निर्घृण हत्या केली. हत्येनंतर …

Read More »

मुतगे येथील विहिरीत आढळला शिरविरहित मृतदेह

बेळगाव : शिरविरहित मृतदेह विहिरीत आढळून आल्याची खळबळजनक घटना बेळगाव तालुक्यातील मुतगा येथे उघडकीस आली आहे. अज्ञात मारेकऱ्यांनी सुमारे ३० वर्षे वयाच्या तरुणाचा गळा चिरून शीर वेगळे करून धड विहिरीत टाकून दिल्याचे स्पष्ट झाले आहे. मुतगा येथे आज सकाळी-सकाळीच सगळ्यांना घाम फोडणारी घटना उघडकीस आली. अज्ञात युवकाचा खून करून त्याचे …

Read More »

बेळगांव – जांबोटी रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी

नगरसेवक रवी साळुंखे यांची निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी बेळगाव : बेळगांव ते जांबोटी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. बेळगावहून गोव्याला जाण्यासाठी चोर्ला मार्ग हा जवळचा मार्ग आहे. बेळगांव- गोवा मार्गावर वाहनांची वर्दळ जास्त असते. शिवाय बेळगावहून गोव्याला भाजीपाला पुरवठा करणारी वाहने …

Read More »