Saturday , July 27 2024
Breaking News

जि. पं. सदस्य रमेश गोरल यांनी जपली सामाजिक बांधीलकी!

Spread the love

बेळगाव : सध्याच्या कोरोना प्रादुर्भाव आणि लॉकडाऊन अशा परिस्थितीत प्रत्येक जण वेगवेगळ्या मार्गाने आपली सामाजिक बांधिलकी जपताना दिसत आहे. यामध्ये लोकप्रतिनिधी पैकी येळ्ळूरचे जि. पं. सदस्य रमेश गोरल आघाडीवर असून सर्वसामान्य नागरिकांसह सेवाभावी संघटनांना उत्स्फूर्त सहाय्य करून ते आपले सामाजिक कर्तव्य पार पाडत आहेत.

मागील वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेप्रसंगी आणि लॉकडाऊनच्या काळात अनेकांना मदत करणारे जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल यावेळी देखील आपली सामाजिक बांधिलकी जपताना दिसत आहेत.

कोरोनाची सध्याची दुसरी लाट अतिशय संहारक ठरली असून अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. सध्याचा काळ अतिशय प्रतिकूल असल्याचे लक्षात घेऊन मागील वर्षापेक्षा दुप्पट उत्साहाने रमेश गोरले सर्वसामान्य गरजू लोकांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत.

कोरोना बाधित रुग्णांना सरकारी अथवा खाजगी हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध करून देणे, ज्यांना औषध पाण्याची गरज आहे त्यांना ती उपलब्ध करून देणे आदी सेवाभावी कार्य करण्याबरोबरच गोरल हे यावेळी मोफत अन्न वाटप करणाऱ्या सेवाभावी संघटनांच्या पाठीशी उभे राहिले आहेत.

सलग दुसऱ्या वर्षी कोरोना काळात गरजूंना दोन वेळेचे जेवण उपलब्ध करून देणाऱ्या जीवनदीप फौंडेशनसह युवासेना बेळगाव या संघटनेला जि. पं. सदस्य रमेश गोरल आर्थिक सहाय्य केले आहे. सद्य परिस्थितीत सरकारी अधिकाऱ्यांशी समन्वय साधून अनेकांना हॉस्पिटलमधील बेड्स, औषधे वगैरे सरकारी सुविधा मिळवून देण्याचे लोकप्रतिनिधी या नात्याने आपले कर्तव्य पार पाडत असतानाच सेवाभावी संघटनांच्या कार्यास हातभार लावणारे रमेश गोरल एक कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी म्हणून पुढे येत आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

About Belgaum Varta

Check Also

मुसळधार पावसामुळे कडोली येथे घर कोसळले!

Spread the love  कडोली : बेळगाव तालुक्यातील कडोली गावात बुधवारी रात्री मुसळधार पावसामुळे जुने घर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *