Sunday , July 26 2026
Breaking News

पुणे : सॅनिटायझर बनवणाऱ्या कंपनीला लागलेल्या आगीत 18 कामगारांचा होरपळून मृत्यू

Spread the love

पिरंगुट – उरवडे (ता. मुळशी) येथील एका सॅनिटायझर बनवणाऱ्या कंपनीला आज दुपारी भीषण आग लागली. अचानक लागलेल्या आगीमुळे कंपनीत 20 मजूर अडकून पडले होते. यापैकी 18 जणांचे मृतदेह सापडले आहेत. भीषण आगीत होरपळून मृत्यू झाल्याने मृतदेहांची ओळख पटविणे अवघड झाले आहे.
अग्निशामक दलाच्या 3 गाड्यांसह आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान घटनेची माहिती मिळताच मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण आणि पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी लागलीच धाव घेतली आहे.
पिरंगुट एमआयडीसीमध्ये अनेक छोट्या मोठ्या कंपन्या आहेत. हजारो कामगार कामास येत असतात. अशा परिस्थितीत उरवडे स्थित एस. व्ही. एस. अक्वॉ कंपनीत आज मोठी दुर्घटना घडली. दुपारी अचानक लागलेल्या आगीमध्ये कंपनीचे 15-20 मजूर, यामध्ये महिला मजूर जास्त असून ते अडकून पडले आहेत. अठरा जणांचे मृतदेह सापडले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

राज्यात चांगला पाऊस, शेतकऱ्यांचे कल्याण होऊ दे; मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची महापूजा

Spread the love    पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *