Sunday , July 26 2026
Breaking News

पेट्रोल-डिझेल दरवाढीसंदर्भात चंदगड तालुक्यात काँग्रेसच्यावतीने जन आंदोलन

Spread the love

चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : चंदगड तालुक्यात आज दुपारी काँग्रेसच्यावतीने भाजप सरकारने वाढवलेल्या पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीसंदर्भात जन आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजीराव देसाई- शिरोलीकर यांनी केले. कोवाड, नागणवाडी, कार्वे येथील पेट्रोल पंपावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला. कार्वे येथील बेळगाव-वेंगुर्ला मार्ग येथील आंदोलनाने काही काळ वाहतूक खोळंबली. भाजप सरकारच्या अन्यायकारक दरवाढीने सर्वसामान्यांच्या जीवनातील अच्छे दिन निघून गेल्याच्या भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

यावेळी संभाजीदादा देसाई, जे.बी.पाटील, राजेंद्र परीट, बाळासाहेब हळदणकर, एम. जे.पाटील, कल्लापा भोगण, बाळु हळदणकर, अभिजित गुरबे, जयसिंग पाटील, कलीम मदार, उदय देसाई, उत्तम पाटील, प्रदीप पाटील, जनार्दन देसाई, मेहताब नाईकवाडे, गोमटेश वनकुंद्रे, पांडू लासे, सुधाकर बांदिवडेकर, तुकाराम पाटील, कल्लापा पाटील, विष्णु नाईक, परशुराम रेडेकर, राजू मरगळे, उत्तम उपलकर, संदीप नांदवडेकर, नामदेव नार्वेकर, उदय देसाई यांच्यासह बहुसंख्य काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी चंदगड पोलिसांच्या मोठा फौजफाटा प्रत्येक पेट्रोल पंपाच्या ठिकाणी उपस्थित केला होता.

About Belgaum Varta

Check Also

आदमापूर बाळूमामा देवस्थानातील ६०.७५ कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल; जिल्ह्यात खळबळ

Spread the love  कोल्हापूर : महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि मध्य प्रदेशसह लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *