Saturday , July 27 2024
Breaking News

कोल्‍हापूर : हुपरीच्या चांदी व्यापाऱ्याची स्‍वत:वर गोळी झाडून आत्‍महत्‍या

Spread the love

कोल्‍हापूर : आजाराला कंटाळून (५५ वर्षीय) चांदी व्यापाऱ्याने पिस्तुलमधून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना आज (मंगळवार) सकाळी हुपरी येथे घडली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
हुपरी येथील चांदी व्यापारी कोरोनाबाधित होता. त्‍यांच्यावर उपचारही सुरू होते. त्‍यांना नुकताच डिस्‍चार्जही मिळाला होता. मात्र आजाराला कंटाळून त्‍यांनी स्वतःवर पिस्तूलातून गोळी झाडून आत्महत्या केली. पोलिस उपअधीक्षक  बाबुराव महामुनी घटनास्थळी दाखल झाले असून या घटनेचा तपास सुरु आहे.

About Belgaum Varta

Check Also

मराठा क्रांती मोर्चाचा आवाज हरपला; दिलीप पाटील यांचे निधन

Spread the love  कोल्हापूर : मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि मराठा आरक्षण याचिकाकर्ते दिलीप पाटील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *