Thursday , October 10 2024
Breaking News

नेताजी मल्टीपर्पज सोसायटीच्यावतीने सोसायटीचे संस्थापक सदस्य व येळ्ळूर ग्रामपंचायत सदस्य महेश कानशिडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली

Spread the love
येळ्ळूर : स्व. महेश कानशिडे यांच्या प्रतिमेचे पूजन करताना चेअरमन डी. जी. पाटील व व्हाईस चेअरमन रघुनाथ मुरकुटे, बाजूला प्रा. सी. एम. गोरल, भरतकुमार मुरकुटे, सी. एम. उघाडे, डॉ. कुलदीप लाड, किरण गिंडे, परशराम गिंडे, शंकर मुरकुटे, दीपक हट्टीकर आदी.

येळ्ळूर : येथील नेताजी मल्टीपर्पज को-ऑप सोसायटीचे संस्थापक सदस्य व ग्रामपंचायत सदस्य महेश हणमंत कानशिडे यांचे गुरुवार ता. (3) रोजी हृदयविकाराने निधन झाले. यानिमित नेताजी सोसायटीमध्ये सोसायटीचे सर्व संचालक, सल्लागार व कर्मचारी वर्ग यांच्यावतीने स्व. महेश कानशिडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रारंभी सोसायटीचे चेअरमन डी. जी. पाटील यांनी महेश कानशिडे यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन केले. त्यानंतर व्हाईस चेअरमन रघुनाथ मुरकुटे यांनी पुष्पांजली वाहून श्रद्धांजली वाहिली. यानंतर नेताजी सोसायटीचे संचालक प्रा. सी. एम. गोरल यांनी सोसायटीचे सल्लागार सदस्य महेश कानशिडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी बोलताना चेअरमन डी. जी. पाटील म्हणाले, समाज कार्यात सतत रमणारे शांत, प्रेमळ व हसऱ्या स्वभावाचे आमचे मित्र महेश कानशिडे हे आम्हा सर्वांना अचानक सोडून निघून गेले. सोसायटी स्थापनेपासून ते मंगल कार्यालय पूर्ण होईपर्यंत महेश कानशिडे यांनी खुप मोठी जबाबदारी घेऊन सर्व कार्य व्यवस्थितरित्या पार पाडले. सोसायटीच्या प्रत्येक कार्यक्रमात ते हिरीरीने भाग घेत होते. अलीकडच्या काळात येळ्ळूर गावचे ग्रामपंचायत सदस्य म्हणूनही टास्क फोर्स कमिटीच्या माध्यमातून अगदी चांगली जबाबदारी ते पार पाडत होते. असं हे समाजशील व्यक्तिमत्त्व अचानक आम्हा सर्वांना सोडून गेल्याची खंत वाटते. यावेळी सोसायटीचे संचालक भरतकुमार मुरकुटे, व्हाईस चेअरमन रघुनाथ मुरकुटे, प्रा. सी. एम. गोरल, कर्मचारी चांगदेव मुरकुटे यांनीही आपल्या मित्राबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. या शोकसभेला संचालक सी. एम. उघाडे, किरण गिंडे, पी. एम. गिंडे, भोमानी छत्र्यांन्नवर, डॉक्टर कुलदीप लाड, पांडुरंग घाडी, शंकर मुरकुटे, दीपक हट्टीकर, चांगदेव मुरकुटे, रवींद्र कणबरकर, विजय धामणेकर, सौ. कल्याणी पावले, सौ. कांचन पाटील, सौ. सोनाली सायनेकर, लता गिंडे, दीक्षा नाईक, नेहा गोरल, संगीता दणकारे आदी यावेळी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

आम. असिफ सेठ यांची विविध वसतिगृहांना भेट

Spread the love  बेळगाव : बेळगाव उत्तर मतदार संघाचे आमदार असिफ (राजू) सेठ यांनी आज …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *