मध्यवर्ती श्रीगणेशोत्सव महामंडळ शहापूर विभाग यांच्यावतीने निवेदन सादर
बेळगाव (प्रतिनिधी) : आगामी सार्वजनिक गणेशोत्सवासाठी प्रशासनाने गणेश भक्तांना सहकार्य करावे. त्याचप्रमाणे हा उत्सव पारंपरिक पद्धतीने आचरण करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी मध्यवर्ती श्री गणेशोत्सव महामंडळ शहापूर विभाग यांच्यावतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, मागील वर्षी कोरोनाचा प्रभाव अधिक असल्यामुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला होता. यावर्षी कोरोनाचा प्रभाव कमी झाला असून आता उत्सव साजरा करण्यासाठी नियम पालन करण्याची मंडळांची तयारी आहे. त्यानुसार मुभा देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी महामंडळाचे अध्यक्ष नेताजी जाधव, कार्याध्यक्ष रमेश सोनटक्की, उपाध्यक्ष अशोक चिंडक, सेक्रेटरी राजू सुतार, खजिनदार मंगेश नागोजीचे, माजी नगरसेवक राजू बिरजे, श्रीकांत कदम, राजाराम सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta