बेळगाव (प्रतिनिधी) : देशातील सध्याची परिस्थिती नागरिकांना त्रासदायक ठरते आहे. वाढत्या महागाईमुळे सामान्यांचे जगणे मुष्कील झाले आहे. त्यामुळे राष्ट्रपतींनी या परिस्थितीचा विचार करावा आणि नागरिकांचे जगणे सुसह्य करण्यासाठी उपाययोजनांची कार्यवाही करावी, अशी मागणी सुराज्य निर्माण आंदोलन या संस्थेतर्फे करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राष्ट्रपतींना पाठवून देण्यात आले. देशातील परिस्थितीचा जनसामान्यांवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे नागरिकांचे जीवन त्रासदायक बनले आहे. याची नोंद घेवून कृतीशील पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन संस्थेचे अध्यक्ष राजन हुलबत्ते, सचीव प्रशांत कुलकर्णी, उपाध्यक्ष दस्तगीर आगा, फारूख हिप्परगी, किशोर जैन, हेमंत लगाडे, संजय गोटाडकी, मोहन परमार आदींनी सादर केले.
Belgaum Varta Belgaum Varta