Wednesday , April 17 2024
Breaking News

तानाजी सावंत यांना जिल्हा परिषदेचा गौरवशाली राजर्षी शाहू पुरस्कार घोषीत…

Spread the love

चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : कोल्हापूर जिल्हा परिषदेकडून कर्मचार्‍यांच्या कामाला प्रोत्साहन मिळावे या हेतूने वर्ग ३ आणि वर्ग ४ मधील (ग्रामसेवक तथा शिक्षक वगळून) इतर प्रवर्गातील कर्मचार्‍यांना २००१ पासून राजर्षी शाहू पुरस्कार दिला जातो. शाहू महाराज जयंतीच्या पूर्वसंधेला सन २०२०-२१ साठीच्या राजर्षी शाहू पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यावर्षी एकुण १४ कर्मचार्‍यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून यासाठी कर्मचार्‍यांची निवड करताना त्यांचे गोपनिय अहवालातील अतिउत्कृष्ठ शेरे, समयसुचकता, प्रशासकिय कामाची माहिती, निर्णयशक्ती, नियमांचे ज्ञान, सामाजिक तथा शैक्षणिक कलागुण, सचोटी आणि प्रामाणिकपणा यासारख्या निकषांच्या आधारे या पुरस्कारांसाठी कर्मचार्‍यांची निवड केली जात असते.
इब्राहिमपूर गावचे सुपुत्र तसेच चंदगड पंचायत समितीचे वरीष्ठ सहायक तानाजी बाबाजी सावंत यांना या वर्षीचा राजर्षी शाहू पुरस्कार जाहिर झाला आहे. त्यांनी कनिष्ट सहायक पदापासुन चंदगड पंचायत समितीमध्ये आपल्या सेवेची सुरवात केली तल्लख बुद्धीमत्ता, अनुभव, प्रामाणिकपणा तसेच समाजाप्रती असलेली तळमळ या जोरावर त्यांनी वरीष्ठ सहायक पदापर्यंत भरारी घेतली आपल्या कार्यतत्पर स्वभामूळे चंदगड पंचायत समितीचे तमाम कर्मचारी, पदाधिकारी आणि विविध विभागाचे खातेप्रमुख तसेच जनमानसात त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली असून त्यांना कोल्हापूर जिल्हापरिषदेचा गौरवशाली राजर्षी शाहू पुरस्कार घोषीत झाला आहे त्यांच्या सोबतच या विभागातुन कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वरीष्ठ सहायक प्रतिमा सर्जेराव पाटील यांना विभागून सदर पुरस्कार दिला जाणार आहे. संयमी, धोरणी, प्रशासनिक कामावर पकड असणारे, मितभाषी स्वभावाचे तानाजी सावंत यांची या पुरस्कारासाठी निवड घोषित झाल्यानंतर इब्राहिमपूर ग्रामस्थांच्या वतीने तसेच चंदगड तालुक्यातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. प्रशस्तीपत्रक आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून कोरोना परस्थिती निवळल्यानंतर पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात आली आहे.

राजर्षी शाहू पुरस्कार प्राप्त कर्मचारी पुढीलप्रमाणे:-
अमित अप्पासाहेब माळगे (अधिक्षक पंचायत समिती गडहिंग्लज), तानाजी बाबाजी सावंत (वरीष्ठ सहायक पंचायत समिती चंदगड) विभागून, प्रतिमा सर्जेराव पाटील (कृषी विभाग वरीष्ठ सहायक, जिल्हा परिषद कोल्हापूर), अमर ज्ञानदेव माळी ( कनिष्ठ सहायक प्रा.आरोग्य केंद्र उचगाव), दिलीप दिनकर काळे वहानचालक (विभागून) पंचायत समिती कागल, संभाजी आनंदा सारंग (सामान्य प्रशासन विभाग जि.प.कोल्हापूर), सचिन मधूकर आंबेकर (परिचर शिक्षण (प्राथ) विभाग जि.प.कोल्हापूर), बाळू मनोहर नाईक परिचर प्रा.आरोग्य केंद्र पट्टणकडोली, पंडित गोपाळ राठोड (विस्तार आधिकारी कृषी पं.स. करवीर), बाबाजीराव शंकर मिसाळ (शाखा अभियंता उपविभाग बांधकाम पं.स.गगनबावडा), सुनिता चंद्रकांत नखाते (सहायक लेखाधिकारी पं.स. हातकणंगले), सुरेखा विठ्ठल कदम ( एकात्मिक बालविकास सेवा योजना कोल्हापूर ग्रामिण पं.स.करवीर), सचिन राजाराम पाटील (पशूधन पर्यवेक्षक (विभागून) पशूवैद्यकिय दवाखाना कोथळी पं.स.करवीर), मालिक मानिक कादरभाई (वर्णोपचारक (विभागून) पशूवैद्यकिय दवाखाना आजरा पं.स. आजरा)

About Belgaum Varta

Check Also

शेट्टीहळ्ळीत हत्तींचा उपद्रव : उभ्या पिकाची नासाडी

Spread the love  चंदगड : गेल्या एक महिन्यापासून कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर जंगली हत्ती धुमाकूळ घालत असून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *