खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील जांबोटी येथील जांबोटी राजवाड्याजवळील सातेरी मंदिर पाशी दुभत्या म्हशीचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दि. २६ रोजी रोजी घडली.
यावेळी घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, जांबोटी गावचे शेतकरी नारायण इंगळे यांनी आपली जनावरे चरावयास नेली होती. सातेरी मंदिराजवळ असलेल्या ट्रान्सफॉर्मर जवळ म्हैस जाताच ट्रान्सफॉर्मर विद्युत प्रवाह वाहिल्याने म्हैशीला विजेचा धक्का बसला त्यातच म्हैस जागीच ठार झाली. या भीतीने शेतकरी नारायण इंगळे यांनी ओरडाओरड केली व इतर जनावरे बाजुला मारली. लागलीच ग्रामस्थांनी हेस्काॅम कर्मचाऱ्याना माहिती दिल्याने वीज पुरवठा बंद करण्यात आला. या दुर्घटनेत नारायण इंगळे यांना ६० हजार रूपयाचे नुकसान झाले.
लागलीच हेस्काॅम कर्मचारी अधिकाऱ्यांनी भेट देऊन पंचनामा केला.
