बेळगाव : दि. २६ राेजी सायंकाळी ८ वाजता मच्छे येथील बाल शिवाजी वाचनालयामध्ये लोकराजा छत्रपती श्री शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन मारुती बेळगावकर यांनी केले. शाहीर मेघा धामणेकर हीने पाेवाडा सादर केला. ढाेलकीवर साथ सिध्दांत धामणेकर याने दिली.
बजरंग धामणेकर व विनायक चाैगुले यांनी शाहू महाराज यांच्या जीवनावर माैलीक विचार मांडले. या कार्यक्रमाला सर्व वाचकांची उपस्थिती हाेती.
रविवार दि.२७ जुन राेजी बाल शिवाजी वाचनालयातर्फे शाहू महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधुन वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी तलाव व ब्राह्मलिंग मंदिर परिसरात २५ झाडे लावण्यात आली, या कार्यक्रमाला बजरंग धामणेकर, विनायक चाैगुले, केतन चाैगुले, सूरज अनगाेळकर, बसवंत लाड, उल्हास पाटील, संदीप वागाेजी, प्रवीण कणबरकर, नारायण अनगाेळकर, पुंडलिक कणबरगी व पर्यावरण प्रेमी युवक उपस्थित होते
