बेळगाव : महिला व बालकल्याण मंत्री शशिकला जोल्ले या अचानक बुधवारी सायंकाळी खानापूर मार्गे बेळगावला जाताना येथील शिवस्मारक चौकात येताच खानापूर भाजप शहर अध्यक्ष राजेंद्र रायका यांनी मंत्रीमहोदयांच्या ताफ्याला आडवे जाऊन थांबविले व महिला व बालकल्याण मंत्री शशिकला जोल्ले यांना जाब विचारला. भाजपच्या मंत्री व जबाबदारी
म्हणून पक्षाच्या नेत्यांना का कळविले नाही. पक्षाच्या प्रोटोकॉलप्रमाणे का कळविले नाही? असा जाब विचारताच पक्षाच्या नेत्यांचा रोष ओळखून चूक कबूल केली. काही कारणास्तव कळवू शकलो नाही. अशी कबूली दिली व दिलगीरी व्यक्त केली. पुढील वेळेला लवकरात लवकर खानापूर तालुक्याचा दौरा करू असे आश्वासन दिले. त्यामुळे खानापूर तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांतून समाधान पसरले.
